advertisement

IND vs NZ 2nd T20I : ईशान किशनच्या एका गोष्टीवर भडकला होता सूर्यकुमार यादव, मॅच जिंकल्यावर सगळंच बाहेर काढलं!

Last Updated:

Suryakumar Yadav Angry On Ishan Kishan : आम्हाला आमच्या फलंदाजांकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी निडरपणे खेळावे. मला फक्त एकाच गोष्टीचा राग येत होता की... असं म्हणत सूर्याने सगळा राग काढला.

Suryakumar Yadav statement On Why he Angry over Ishan Kishan
Suryakumar Yadav statement On Why he Angry over Ishan Kishan
India vs New Zealand 2nd T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील रोमहर्षक मॅचमध्ये ईशान किशनच्या (Ishan Kishan) वादळी फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीला केवळ 6 रन्सवर 2 विकेट्स पडल्यानंतर भारतीय टीम अडचणीत येईल असे वाटले होते. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर डावाची सूत्रे ईशानने आपल्या हातात घेतली. त्याने मैदानावर येताच आक्रमक पवित्रा स्वीकारला आणि न्यूझीलंडच्या बॉलरवर तुटून पडत अवघ्या 21 बॉल्समध्ये आपली फिफ्टी पूर्ण केली. तर कॅप्टन सूर्याने (Suryakumar Yadav) गेल्या 14 महिन्यांपासून लागलेलं ग्रहण सोडलं.

टीमची लय बिघडवून टाकली

ईशान किशनने पावरप्लेचा पुरेपूर वापर करत टीमची धावसंख्या वेगाने पुढे नेली. त्याच्या या फटकेबाजीमुळे दबावाखाली असलेल्या भारतीय टीमला मोकळा श्वास घेता आला. मॅच संपल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवने ईशानच्या या खेळीबद्दल मजेशीर विधान केले. सूर्याने सांगितले की, ईशान इतक्या जबरदस्त फॉर्ममध्ये होता की त्याने पावरप्लेमध्ये विरोधी टीमची पूर्णपणे लय बिघडवून टाकली होती.
advertisement

मला फक्त एकाच गोष्टीचा राग येत होता...

सूर्या म्हणाला की, "मला माहित नाही ईशान किशनने लंचमध्ये काय खाल्ले होते, पण 6 रन्सवर 2 विकेट्स गेलेल्या असताना पावरप्लेमध्ये 60 पेक्षा जास्त रन्स बनवताना मी कोणालाही पाहिले नाही. आम्हाला आमच्या फलंदाजांकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी निडरपणे खेळावे. मला फक्त एकाच गोष्टीचा राग येत होता की, तो पावरप्लेमध्ये मला स्ट्राईक देत नव्हता, मात्र नंतर मला परिस्थिती समजली."
advertisement

नेटमध्ये भरपूर सराव केला

स्वतःच्या फॉर्मबद्दल बोलताना सूर्यकुमारने सांगितले की, त्याने नेटमध्ये भरपूर सराव केला होता आणि विश्रांतीनंतर तो पूर्णपणे ताजेतवाना होऊन मैदानात उतरला आहे. न्यूझीलंडची स्थिती एका वेळी 110 रन्सवर 2 विकेट्स अशी असताना त्यांना 230 पर्यंत मजल मारता येईल असे वाटले होते. मात्र, भारतीय बॉलर्सनी अचूक टप्प्यावर बॉलिंग करत न्यूझीलंडला रोखले आणि आपली जबाबदारी चोख पार पाडली.ॉ
advertisement

आत्मविश्वास प्रचंड वाढला

सध्या टीममधील वातावरण अत्यंत उत्साही आणि आनंदी असल्याचे सूर्याने नमूद केले. खेळाडू एकमेकांच्या यशाचा आनंद घेत आहेत आणि हीच सकारात्मकता पुढे नेण्याचा कॅप्टनचा मानस आहे. ईशान किशनच्या या धडाकेबाज खेळीने भारतीय फॅन्सना पुन्हा एकदा हाय व्होल्टेज क्रिकेटचा अनुभव दिला असून, आगामी मॅचसाठी टीमचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ 2nd T20I : ईशान किशनच्या एका गोष्टीवर भडकला होता सूर्यकुमार यादव, मॅच जिंकल्यावर सगळंच बाहेर काढलं!
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement