advertisement

पुणेकरांनो, प्रवास करताना सावधान! बंडगार्डन परिसरात रिक्षाचालकाचं प्रवाशासोबत धक्कादायक कृत्य, वाचूनच उडेल थरकाप

Last Updated:

बंडगार्डन मेट्रो स्थानक परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका १९ वर्षीय तरुणाला लुटल्याची घटना घडली आहे.

रिक्षाचालकानं लुटलं (AI Image)
रिक्षाचालकानं लुटलं (AI Image)
पुणे : पुणे शहरात रिक्षाचालकांकडून प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वाढत असतानाच, आता बंडगार्डन मेट्रो स्थानक परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका १९ वर्षीय तरुणाला लुटल्याची घटना घडली आहे. रिक्षाचालकाने आपल्या साथीदारांसह मिळून बिहारवरून आलेल्या दोन तरुणांना शस्त्राचा धाक दाखवून लुटलं.
नेमकी घटना काय?
मूळचा बिहारचा असलेला १९ वर्षीय फिर्यादी तरुण आपल्या मित्रासह पुणे रेल्वे स्थानकावर उतरला होता. तिथून गुरुवारी (२२ जानेवारी) हे दोन्ही तरुण रिक्षाने आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. रिक्षा बंडगार्डन रस्ता परिसरात आली असता, मेट्रो स्थानकाजवळ रिक्षाचालकाने अचानक रिक्षा थांबवली.
धमकावून ऐवज लांबवला: रिक्षा थांबताच चालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी दोन्ही तरुणांना घेरलं. त्यांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील साडेतीन हजार रुपयांची रोकड आणि महागडा मोबाईल असा एकूण २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला. लूटमार केल्यानंतर आरोपी रिक्षासह पसार झाले.
advertisement
धक्क्यातून सावरल्यानंतर तरुणाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मेट्रो स्थानक आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. रेल्वे स्थानकावरून रिक्षात बसताना प्रवाशांनी रिक्षाचा नंबर आणि चालकाची माहिती तपासावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
advertisement
फेसबुक फ्रेंडकडून फसवणूक 
सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीवर किंवा प्रेमावर विश्वास ठेवणं किती घातक ठरू शकतं, याचा प्रत्यय देणारी आणखी एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात फेसबुकवरील मैत्री आणि प्रेमसंबंधांच्या जाळ्यात ओढून एका तरुणीला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आला आहे. लग्नाचे आणि घरगुती अडचणींचे खोटे कारण सांगून एका तरुणाने तरुणीची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो, प्रवास करताना सावधान! बंडगार्डन परिसरात रिक्षाचालकाचं प्रवाशासोबत धक्कादायक कृत्य, वाचूनच उडेल थरकाप
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement