Pune News: पुणेकरांनो आज घराबाहेर पडण्याआधी हे वाचाच! शहरातील शाळांना सुट्टी, हे 93 महत्त्वाचे रस्ते बंद
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आज 'पुणे ग्रँड टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा रंगणार आहे. शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे महापालिका हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आज (शुक्रवारी, २३ जानेवारी) 'पुणे ग्रँड टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा रंगणार आहे. या भव्य क्रीडा सोहळ्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे महापालिका हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
शाळांना सुट्टी आणि प्रशासकीय नियोजन: सह-पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, सायकल स्पर्धा शहराच्या मध्यवस्तीतून जाणार असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी तब्बल ४ हजार ३८१ पोलीस कर्मचारी आणि १२ पोलीस उपायुक्तांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
advertisement
स्पर्धेचा मार्ग आणि वाहतूक बदल:
बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून स्पर्धेला सुरुवात होईल आणि बालगंधर्व रंगमंदिर येथे समारोप होईल. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत स्पर्धेच्या ७५ ते ९५ किमी लांबीच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. राधा चौक (बाणेर), सूस रस्ता, पाषाण, पुणे विद्यापीठ चौक, सेनापती बापट रस्ता, कर्वे रस्ता, वनाज, नळस्टॉप, टिळक रस्ता आणि अप्पा बळवंत चौक या भागांतून ही शर्यत मार्गक्रमण करेल.
advertisement
वाहतूक विभागाचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, स्पर्धेच्या मार्गावर कोठेही वाहने उभी करू नयेत. तसेच प्रेक्षकांनी बॅरिकेड्सच्या मागे राहूनच खेळाडूंचा उत्साह वाढवावा. दुपारी १२ ते ४ या वेळेत पाषाण, लॉ कॉलेज रस्ता आणि सातटोटी चौक यांसारखे महत्त्वाचे रस्ते आवश्यकतेनुसार पूर्णपणे बंद ठेवले जातील.
बंद ठेवले जाणारे प्रमुख रस्ते (दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत):
राधा चौक ते पूनम बेकरी (बाणेर - सूस रस्ता)
advertisement
पाषाण सर्कल ते राजीव गांधी पूल (विद्यापीठ रस्ता)
राजीव गांधी पूल ते सेनापती बापट जंक्शन
सेनापती बापट रस्ते ते बालभारती
लॉ कॉलेज रस्ता ते शेलार मामा चौक
कर्वे पुतळा चौक ते वनाज-पौड रस्ता
नळस्टॉप ते सेनादत्त पोलीस चौकी
सेनादत्त चौक ते टिळक चौक
टिळक रस्ता ते बाजीराव रस्ता
अप्पा बळवंत चौक ते राष्ट्रभूषण चौक
advertisement
राष्ट्रभूषण चौक ते सावरकर चौक
सावरकर चौक ते महाराष्ट्र मित्र मंडळ
महाराष्ट्र मित्र मंडळ ते सेवन लव्हज चौक
सेवन लव्हज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक (नेहरू रस्ता)
घोरपडी जंक्शन परिसर
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 7:17 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांनो आज घराबाहेर पडण्याआधी हे वाचाच! शहरातील शाळांना सुट्टी, हे 93 महत्त्वाचे रस्ते बंद








