हवामान अपडेट: उत्तर भारतात गारपीठ तरी तापमान वाढणार, महाराष्ट्रात कसं राहील हवामान?

Last Updated:

उत्तर भारतातील पश्चिम विक्षोभामुळे महाराष्ट्रात थंडी कमी होऊन तापमान वाढणार आहे. मुंबई, ठाणे, कोकणात ढगाळ वातावरण, विदर्भात धुके, पावसाची शक्यता कमी.

News18
News18
उत्तर भारतात सध्या दोन बॅक-टू-बॅक पश्चिम विक्षोभ धडकले आहेत. यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि पंजाबमध्ये मुसळधार पाऊस व बर्फवृष्टी होत आहे. या हवामान बदलाचा परिणाम महाराष्ट्रातील थंडीवर झाला असून, येत्या काही दिवसांत राज्यातून हुडहुडी कमी होऊन उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर भारतातील वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे महाराष्ट्रात पुढील २ ते ४ दिवसांत किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसची वाढ होणार आहे. यामुळे पहाटे जाणवणारा कडाक्याचा गारवा कमी होईल. मुंबईसह ठाणे, पालघर भागात दुपारच्या वेळी उष्णता जाणवेल. किमान तापमान १८ ते २२ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागात गेल्या काही दिवसांपासून थंडी होती, मात्र आता तिथेही तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात होईल.
advertisement
ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता?
उत्तर भारतातील 'पश्चिम विक्षोभा'चा थेट परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र: उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशात आकाश आंशिक ढगाळ राहू शकते. अरबी समुद्रातील आर्द्रतेमुळे दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत अधूनमधून ढग दाटून येण्याची शक्यता आहे, पण पावसाचा मोठा इशारा देण्यात आलेला नाही. २४ आणि २५ जानेवारीच्या पहाटे पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दाट धुके पाहायला मिळू शकते.
advertisement
धुळ्यात पुन्हा गारठा
धुळे, निफाड, गोंदिया या पट्ट्यात पुन्हा एकदा गारठा वाढला आहे. हा गारठा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात आज पहाटे काही ठिकाणी गारवा जाणवेल, मात्र दिवसभर तापमानात वाढ होत उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीत आज ढगाळ वातावरणाचा प्रभाव जाणवणार आहे. सकाळच्या वेळेत काही भागांत हलके धुके दिसू शकते, मात्र दिवसभर हवामान कोरडे आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
advertisement
थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात कमी झाला असून पहाटे आणि रात्री सौम्य गारवा जाणवेल. दिवसा मात्र सूर्यप्रकाशामुळे उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. मुंबई परिसरात कमाल तापमान सुमारे 30 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. समुद्रकिनारी भागात हलके वारे वाहतील, त्यामुळे हवेत आर्द्रता अधिक राहू शकते. पावसाची शक्यता अत्यंत कमी असून, हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हवामान अपडेट: उत्तर भारतात गारपीठ तरी तापमान वाढणार, महाराष्ट्रात कसं राहील हवामान?
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement