सायलेन्ट इलेक्ट्रिक गाड्या आता 'बोलणार'! अपघाताचा धोका टाळण्यासाठी 'ARAI'चा मोठा निर्णय, ऑक्टोबरपासून महत्त्वाचा बदल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
विद्युत वाहनांना इंजिनचा आवाज नसल्यामुळे ती जवळ आल्याचे पादचाऱ्यांना किंवा इतर वाहनचालकांना समजत नाही. यातून अपघाताचा धोका निर्माण होतो.
पुणे : पुणे येथील 'ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया'ने (ARAI) विद्युत वाहनांच्या (EV) सुरक्षेबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहने शांत चालत असल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी आता या वाहनांमध्ये 'अॅकॉस्टिक व्हेइकल अलर्टिंग सिस्टीम' (AVAS) ही प्रणाली बसवण्यात येणार आहे. यामुळे आता आगामी काळात शांत धावणाऱ्या इलेक्ट्रिक कारमधूनही विशिष्ट आवाज येणार आहे.
ऑक्टोबरपासून अंमलबजावणी: 'एआरएआय'चे संचालक रेजी मथाई यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, विद्युत वाहनांना इंजिनचा आवाज नसल्यामुळे ती जवळ आल्याचे पादचाऱ्यांना किंवा इतर वाहनचालकांना समजत नाही. यातून अपघाताचा धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी 'एआरएआय'ने संशोधनाअंती 'AVAS' प्रणाली विकसित केली आहे. चारचाकी वाहनांसाठी या प्रणालीच्या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, ऑक्टोबर २०२६ पासून त्याची अधिकृत अंमलबजावणी सुरू होईल. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी सध्या या प्रणालीच्या चाचण्या सुरू आहेत.
advertisement
SIAT २०२६ चे आयोजन: पुण्यात २७ ते ३० जानेवारी दरम्यान 'सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी' (SIAT 2026) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत वाहन क्षेत्रातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि भविष्यातील बदलांवर चर्चा होणार आहे. तसेच, वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनाचा आणि हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करण्यासाठी 'एआरएआय' आता आयआयटी-दिल्लीच्या सहकार्याने नव्याने संशोधन करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 8:05 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सायलेन्ट इलेक्ट्रिक गाड्या आता 'बोलणार'! अपघाताचा धोका टाळण्यासाठी 'ARAI'चा मोठा निर्णय, ऑक्टोबरपासून महत्त्वाचा बदल







