प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियनचा मोठा निर्णय, मंचावरच केली धक्कादायक घोषणा; चाहत्यांची झोपच उडाली
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Famous Comedian Announces Long Hiatus : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियनने मोठा निर्णय घेतला आहे. शोच्या मंचावरच त्याने धक्कादायक घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांची झोपच उडाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
झाकीरची इंस्टा स्टोरी सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. झाकीरने बुर्ज खलिफाचा फोटो शेअर करत त्याने 20 जून हा कदाचित त्याचा शेवटचा परफॉर्मन्स असू शकतो, असे सूचित केले. त्याने लिहिले, “20 जूनपर्यंत प्रत्येक शो एक सोहळा आहे. यावेळी मी अनेक शहरांमध्ये येऊ शकणार नाही, त्यामुळे कृपया तुम्ही प्रयत्न करा आणि शो पाहायला या. तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद.”
advertisement
झाकीर याआधीही सततच्या प्रवासामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयी बोलला आहे. 2025 मधील एका पोस्टमध्ये त्याने सांगितले होते की गेल्या दहा वर्षांपासून सलग टूर करत असल्याने आणि एका दिवसात अनेक शो केल्यामुळे त्याला ना पुरेशी झोप मिळते, ना वेळेवर जेवण करता येते, आणि याचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.
advertisement
आपल्या तब्येतीबद्दल बोलताना झाकीर म्हणाला होता,"मी गेल्या दहा वर्षांपासून सलग टूर करत आहे. तुमच्याकडून मिळणारे प्रेम आणि आपुलकी मला खूप आनंद देते, पण इतका दीर्घकाळ टूर करणे आरोग्यासाठी योग्य नाही. सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न, दिवसाला दोन-तीन शो, झोपेची कमतरता, पहाटेच्या फ्लाइट्स आणि जेवणाची ठरावीक वेळ नसणे हे सगळं यामध्ये येतं. मी गेल्या एक वर्षापासून आजारी आहे, पण त्या वेळी काम करणं गरजेचं वाटल्यामुळे मला काम सुरू ठेवावं लागलं.” झाकीरच्या या घोषणेमुळे त्याचे चाहते सोशल मीडियावर निराशा व्यक्त करत आहेत.









