advertisement

Gem Astrology: विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरते हे रत्न! करिअर आणि शिक्षणात आश्चर्यकारक प्रगती, गुडलक

Last Updated:

Astrology Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रात रत्नं म्हणजे फक्त दागिने नसतात, तर ती ग्रहांची ऊर्जा खेचून आपल्या आयुष्यात बदल घडवून आणतात. विद्यार्थ्यांना कोणते रत्न मानवते, अभ्यासात प्रगती मिळवून देते, याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

News18
News18
मुंबई : खडे-रत्न बोटातील अंगठीत परिधान केली जातात. राशीनुसार योग्य रत्न वारल्यास गुडलक निर्माण होते. वैदिक ज्योतिषशास्त्रात रत्नं म्हणजे फक्त दागिने नसतात, तर ती ग्रहांची ऊर्जा खेचून आपल्या आयुष्यात बदल घडवून आणतात. पन्ना या रत्नाचा थेट संबंध बुध ग्रहाशी आहे. आता बुध म्हटलं की बुद्धी, डोकं चालवणं आणि बोलणं आलं. म्हणूनच पन्ना घातल्याने मनाला शांती तर मिळतेच, बुद्धी तीव्र होते. अभ्यासात चमकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर हे रत्न वरदान मानलं जातं.
पन्ना कुणी घालावा याबद्दल सांगायचं तर, हे रत्न सगळ्यांनाच मानवतं असं नाही, त्यामुळे कुंडली दाखवणं गरजेचं असतं. मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध असल्याने या राशीच्या लोकांसाठी पन्ना खूपच फायदेशीर ठरतो. जर तुमच्या कुंडलीत विद्या किंवा भाग्याच्या स्थानी मिथुन किंवा कन्या रास असेल, तर हे रत्न नक्कीच शुभ फळं देतं. विद्यार्थ्यांशिवाय ज्यांचं काम बोलण्याशी किंवा कल्पकतेशी संबंधित आहे, जसं की लेखक, मार्केटिंगची माणसं किंवा कलाकार, त्यांनीही पन्ना घातल्यास त्यांना फायदा होतो.
advertisement
हे रत्न घालण्याची एक खास पद्धत आहे. पन्ना नेहमी शुक्ल पक्षातील बुधवारी सकाळी सूर्योदयानंतर घालावा. रत्न घालण्यापूर्वी ते कच्चे दूध, गंगाजल, मध आणि साखरेच्या मिश्रणात ठेवून शुद्ध करून घ्यावं. त्यानंतर देवासमोर धूप-दिवा लावून 'ॐ बुं बुधाय नमः' या मंत्राचा जप करावा. देवाची पूजा झाल्यावर ती अंगठी विष्णूच्या चरणांना लावून आपल्या हाताच्या सगळ्यात लहान बोटात म्हणजेच करंगळीत घालावी.
advertisement
पन्ना घातल्याने मनाची भटकंती थांबते आणि अभ्यासात चित्त एकाग्र होतं. खूप वाचूनही जे लक्षात राहत नाही, अशा विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती सुधारण्यास यामुळे मदत होते. बुद्धी तल्लख होते आणि मनातले फालतू विचार कमी होऊन एक प्रकारचा आत्मविश्वास अंगात येतो.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Gem Astrology: विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरते हे रत्न! करिअर आणि शिक्षणात आश्चर्यकारक प्रगती, गुडलक
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement