Weather Update: महाराष्ट्रात थंडी ओसरणार! 24 तासांत हवामानात मोठे उलटफेर; पावसाचाही इशारा

Last Updated:

आजचं हवामान: महाराष्ट्रात थंडी कमी होणार असून तापमानात 2 ते 4 अंश वाढ अपेक्षित आहे. उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात मोठे बदल, हिमवृष्टी व पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

News18
News18
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जाणवणारा थंडीचा कडाका आता हळूहळू कमी होणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात आगामी 24 तासांत तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही, मात्र त्यानंतर किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ होणार आहे. यामुळे थंडी कमी होऊन उबदारपणा वाढणार आहे. कुडकुडणाऱ्या थंडीपासून आता थोडा आराम मिळणार आहे. जिथे 10 वाजेपर्यंत उबदार वाटत नव्हतं तिथे आता ऊन आल्यानं थोडा दिलासा मिळणार आहे.
उत्तरेकडे हवामानात मोठे बदल
हवामान विभागाच्या मते, सध्या एक ट्रफ लाईन सक्रिय आहे आणि 21 जानेवारीच्या रात्रीपासून एक नवीन प्रभावी वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर भारताला धडक देणार आहे. यामुळेच पुढील सात दिवस संपूर्ण उत्तर आणि मध्य भारताच्या हवामानात मोठे फेरबदल होणार आहेत. पश्चिम बंगालच्या उपसागरात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. तर दिल्लीवरही सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि दाढ धुकं यामुळे उत्तर भारतात परिस्थिती बिकट आहे. महाराष्ट्रात मात्र रात्री आणि पहाटे थंडगार गारवा वाटत असून दिवसा मात्र तापमान वाढ होत आहे.
advertisement
महाराष्ट्रावर काय परिणाम होईल?
उत्तर भारतात सक्रिय होत असलेल्या 'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले जातील. परिणामी, मध्य भारत आणि महाराष्ट्रात येत्या 2-3 दिवसांत तापमानाचा पारा वर चढणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात हवामान कोरडे राहील, पण बोचरी थंडी कमी झालेली जाणवेल. महाराष्ट्रात थंडी कमी होत असताना उत्तर भारतात मात्र हवामानाचा डबल अटॅक पाहायला मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमान 33 ते 35 डिग्री अंशांपर्यंत पोहोचलं आहे.
advertisement
पावसाचा इशारा, महाराष्ट्रात काय स्थिती?
22 आणि 23 जानेवारीला जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. २३ जानेवारीला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पावसासह हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. 22 ते 26 जानेवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. पुढचे दोन-तीन दिवस पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये दाट धुके कायम राहील, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update: महाराष्ट्रात थंडी ओसरणार! 24 तासांत हवामानात मोठे उलटफेर; पावसाचाही इशारा
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement