चिंता मिटली! शनिचे नक्षत्र संक्रमण झालं, या राशींच्या लोकांच्या घरात सुख शांतीसह बक्कळ पैसा येणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : शनिदेव म्हटलं की अनेकांच्या मनात भीती आणि कठोरतेची प्रतिमा उभी राहते. शनि म्हणजे संकट, विलंब आणि शिक्षा देणारा ग्रह अशी सर्वसाधारण धारणा आहे.
मुंबई : शनिदेव म्हटलं की अनेकांच्या मनात भीती आणि कठोरतेची प्रतिमा उभी राहते. शनि म्हणजे संकट, विलंब आणि शिक्षा देणारा ग्रह अशी सर्वसाधारण धारणा आहे. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार ही समज अर्धवट आहे. शनिदेव हे केवळ दंड देणारे नसून, कर्माच्या आधारे योग्य फळ देणारे ग्रह मानले जातात. व्यक्तीच्या चांगल्या कर्मांना ते उत्तम फलित देतात, तर चुकीच्या कृतींसाठी योग्य शिक्षा देतात. त्यामुळे शनीचा प्रभाव नेहमीच नकारात्मक असेल, असे नाही.
ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, जेव्हा शनि आपली रास किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर कमी-अधिक प्रमाणात जाणवतो. 2026 या वर्षातील शनिचे पहिले नक्षत्र परिवर्तन 20 जानेवारी रोजी घडले आहे. या बदलाचा विशेष लाभ तीन राशींना होणार आहे.
शनिचे नक्षत्र परिवर्तन का आहे खास?
सध्या शनि मीन राशीत भ्रमण करत असून, संपूर्ण वर्षभर तो याच राशीत राहणार आहे. 2026 मध्ये शनि एकूण तीन वेळा नक्षत्र बदलणार आहे. यातील पहिले नक्षत्र संक्रमण 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजून 13 मिनिटांनी झाले. या वेळी शनि स्वतःच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला. हा बदल काही राशींसाठी भाग्यवर्धक ठरणार आहे.
advertisement
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिचे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ मानले जात आहे. नशिबाची साथ मिळेल आणि आर्थिक स्थिती बळकट होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा अपेक्षित बदलाची संधी मिळू शकते. पगारात वाढ होण्याचे संकेत आहेत. अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहील. तसेच वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता असून, आर्थिक स्थैर्य वाढेल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठीही शनीचे नक्षत्र संक्रमण लाभदायक ठरणार आहे. आर्थिक अडचणी दूर होतील आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल आणि कामाचा विस्तार होईल. परदेशात नोकरी किंवा व्यवसायाची संधी मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचे योग असून, मालमत्तेत वाढ होण्याचे संकेतही आहेत.
advertisement
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी शनीचा हा बदल विशेष अनुकूल आहे. उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल आणि केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. एखादा महत्त्वाचा करार किंवा मोठी संधी हाताशी येऊ शकते. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात, विशेषतः मुलांकडून आनंददायक बातमी मिळू शकते, ज्यामुळे मनःशांती लाभेल.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 6:51 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
चिंता मिटली! शनिचे नक्षत्र संक्रमण झालं, या राशींच्या लोकांच्या घरात सुख शांतीसह बक्कळ पैसा येणार










