Mumbai BMC Mayor : मुंबईत ठाकरेंना 'देव' पावणार? उद्धव ठाकरेंची फडणवीसांसोबत चर्चा! महापौर कुणाचा? कसं आहे संख्याबळाचं गणित?

Last Updated:

Mumbai BMC Mayor Election : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची चर्चा झाली असल्याचं वृत्त समोर येत आहे.

Mumbai BMC Mayor Election
Mumbai BMC Mayor Election
Mumbai BMC Mayor : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने दणदणीत यश मिळवलं अन् तब्बल 25 वर्षानंतर ठाकरेंना सत्तेतून बाजुला ठेवण्यात आलं. मात्र, आता मुंबईच्या राजकारणात ट्विस्ट निर्माण झालाय. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निकालानंतर महापौर निवडीच्या प्रक्रियेत आता एक अत्यंत अनपेक्षित आणि मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची चर्चा झाली असल्याचं वृत्त समोर येत आहे. या नव्या समीकरणामुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात असून, सत्तेच्या सारीपाटावर आता नवे डावपेच आखले जात आहेत.
मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्ष (BJP) सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत जर भाजप सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेत असेल, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) त्यांना पाठिंबा देऊ शकते, अशी माहिती मिळत आहे. हा निर्णय झाल्यास राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा जुन्या युतीच्या चर्चेला उधाण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
मुंबईत भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर ठाकरे गटाने 65 जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीकडे (भाजप आणि शिंदे गट) एकत्रितपणे 118 जागांचे संख्याबळ आहे, जे बहुमताच्या 114 या आकड्यापेक्षा जास्त आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे 29 नगरसेवक आहेत. त्यामुळे शिंदेंना आता मोठा धक्का बसला आहे. भाजप आणि शिंदे यांच्यात महापौर पदावरून रस्सीखेंच सुरू आहे.
advertisement
मुंबई महापालिका निवडणुकीत जरी भाजप आणि शिंदेंना बहुमत मिळालं असलं तरी मुंबईची सत्तेची चावी थेट दिल्लीतून चालावी अशी दिल्लीश्वरची इच्छा आहे, अशी माहिती समोर आली होती. त्यासाठी आपला माणूस म्हणून एकनाथ शिंदेंना पसंतीक्रम होता. मात्र, दावोसला जाण्यासाठी गेम ठाकरेंच्या पारड्यात पाडला अन् मुंबईचं सत्ताकेंद्र आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला गेलाय का? असा सवाल विचारला जातोय.
advertisement
मुंबई महापालिकेत रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे महापौर निवडीच्या प्रत्यक्ष मतदानावेळी ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक अनुपस्थित राहू शकतात. जर ठाकरे गटाचे नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिले, तर बहुमताचा आकडा खाली येईल आणि भाजपचा महापौर निवडून येण्याचा मार्ग मोकळा होईल. अशा प्रकारच्या 'न्यूट्रल' भूमिकेमुळे भाजपला कोणत्याही थेट युतीशिवाय मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करणं सोपं जाणार असल्याचं बोललं जात आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai BMC Mayor : मुंबईत ठाकरेंना 'देव' पावणार? उद्धव ठाकरेंची फडणवीसांसोबत चर्चा! महापौर कुणाचा? कसं आहे संख्याबळाचं गणित?
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement