पुणेकरांसाठी खुशखबर, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आता प्रत्यक्षात धावणार, महत्त्वाची चाचणी यशस्वी
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या यशस्वी ट्रायल रनमुळे या मार्गिकेवर प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक सुरू होण्याच्या दिशेने प्रशासनाने एक मोठे पाऊल टाकले आहे.
पुणे : हिंजवडी आयटी हबला शिवाजीनगरशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन-3 प्रकल्पाने आता एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या मार्गावर मेट्रो कधी सुरू होणार याची नागरिक गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षा करत आहेत. आता मात्र ही सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. हिंजवडी मेट्रो मार्गाची आरडीएसओ अर्थात रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनकडून करण्यात येणारी अनिवार्य सुरक्षा तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. या यशस्वी ट्रायल रनमुळे या मार्गिकेवर प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक सुरू होण्याच्या दिशेने प्रशासनाने एक मोठे पाऊल टाकले आहे.
मेट्रोची आरडीएसओची तपासणी यशस्वी
या तपासणीत ट्रॅक, सिग्नल यंत्रणा आणि सुरक्षिततेशी संबंधित बाबी तपासण्यात आल्या. आरडीएसओची ही तपासणी पूर्ण झाल्याने आता मेट्रो प्रवासी सेवा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पीएमआरडीएच्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी लागणाऱ्या मेट्रो गाड्यांचा (रोलिंग स्टॉक) पुरवठाही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 14 मेट्रो ट्रेनसेट्स पुण्यात दाखल झाले आहेत. मंजूर नियोजनानुसार एकूण 22 मेट्रो गाड्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत. या गाड्यांच्या साहाय्याने पुढील काळात ट्रायल रन, तांत्रिक चाचण्या घेऊन त्यानंतर नियमित प्रवासी सेवा सुरू करण्याची तयारी करण्यात येणार आहे.
advertisement
याच दरम्यान स्थानकांवरील उर्वरित कामेही वेगात सुरू आहेत. स्थानकांच्या इमारती, फलाट, येण्या-जाण्याचे मार्ग आणि इतर मूलभूत सुविधा जवळपास तयार झाल्या आहेत. संपूर्ण मार्ग लवकर सुरू करता यावा यासाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये परस्पर संपर्क ठेवून काम करण्यात येत आहेत. हिंजवडीतील हजारो आयटी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. या मेट्रो मार्गामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 9:17 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांसाठी खुशखबर, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आता प्रत्यक्षात धावणार, महत्त्वाची चाचणी यशस्वी









