Konkan Railway : तिकिटासाठी होणारी धडपड थांबणार! कोकण रेल्वेवर 'ही' गाडी 5 वर्षे दररोज धावणार; पाहा थांबे

Last Updated:

Indian Railways Latest News : जबलपूर-कोइम्बतूर साप्ताहिक स्पेशल ट्रेन पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोकण आणि दक्षिण भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास नियोजन अधिक सुलभ होणार आहे.

Konkan railway route long distance train news
Konkan railway route long distance train news
मुंबई : प्रवाशांची सातत्याने वाढणारी संख्या आणि लांब पल्ल्याच्या प्रवासाची गरज लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत धावणारी जबलपूर-कोइम्बतूर-जबलपूर साप्ताहिक स्पेशल ट्रेन आता थेट पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोकण रेल्वे मार्गासह दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
चाकरमान्यांची वारी आता आणखी सोपी
रेल्वे प्रशासनाच्या नव्या निर्णयानुसार गाडी क्रमांक 02198 जबलपूर-कोइम्बतूर ही साप्ताहिक स्पेशल ट्रेन 6 मार्च 2026 ते 27 डिसेंबर 2030 या कालावधीत धावणार आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 02197 कोइम्बतूर-जबलपूर ही साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन 9 मार्च 2026 ते 30 डिसेंबर 2030 पर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे पुढील पाच वर्षे ही ट्रेन नियमितपणे कोकण रेल्वे मार्गावर धावत राहणार आहे.
advertisement
असे असतील या ट्रेनचे थांबे
या ट्रेनचे प्रमुख थांबे नरसिंगपूर, इटारसी, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, मडगाव, कारवार, उडुपी, मंगळुरू, कासारगोड, कोझिकोड, शोरनूर आणि पालघाट अशा महत्त्वाच्या स्थानकांवर असतील. विशेष म्हणजे या ट्रेनच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये, धावण्याच्या दिवसांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अधिक माहितीसाठी रेल्वेचे संकेतस्थळ तपासा
या निर्णयामुळे कोकण आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रवास नियोजन अधिक निश्चित आणि सोपे होणार असून, सण-उत्सव तसेच सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Konkan Railway : तिकिटासाठी होणारी धडपड थांबणार! कोकण रेल्वेवर 'ही' गाडी 5 वर्षे दररोज धावणार; पाहा थांबे
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement