काम संपवून घरी निघालेला; पण वाटेतच सगळं संपलं, पुण्यात जीव वाचवणाऱ्या 'त्या' गाडीनेच घेतला तरुणाचा जीव
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
समीर नेहाल खान (वय २८) आणि त्याचा मित्र एसपी मुरलीधर कुमार (वय २०, रा. तळवडे) हे दोघे सायंकाळी सातच्या सुमारास कामावरून दुचाकीने घरी परतत होते. याचवेळी ही घटना घडली
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या भरधाव गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचा साथीदार जखमी झाला आहे. याप्रकरणी रावेत पोलिसांनी अग्निशमन दलाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, समीर नेहाल खान (वय २८) आणि त्याचा मित्र एसपी मुरलीधर कुमार (वय २०, रा. तळवडे) हे दोघे शुक्रवारी (१६ जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास कामावरून दुचाकीने घरी परतत होते. पुनावळे येथील गायकवाड नगर परिसरात आले असता, समोरून येणाऱ्या अग्निशमन दलाच्या गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
advertisement
या भीषण अपघातात समीर खान हा गंभीररीत्या जखमी झाला होता. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. फिर्यादी मुरलीधर कुमार हे देखील या अपघातात जखमी झाले आहेत. संशयित चालक वैभव रमेश कोरडे (वय ३२, रा. मुळशी) याने अग्निशमन दलाची गाडी बेदरकारपणे आणि वेगात चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक आरोप आहे.
advertisement
चालकावर गुन्हा दाखल: याप्रकरणी मुरलीधर कुमार यांनी रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सरकारी वाहनावरील चालक वैभव कोरडे याच्यावर निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आपत्कालीन सेवेतील गाड्यांना वेगाची सूट असली, तरी भरवस्तीत गाडी चालवताना सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले गेल्याने एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याची भावना स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 9:14 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
काम संपवून घरी निघालेला; पण वाटेतच सगळं संपलं, पुण्यात जीव वाचवणाऱ्या 'त्या' गाडीनेच घेतला तरुणाचा जीव









