BREAKING: मुंबई महापौर पदावरून सगळ्यात मोठा ट्विस्ट, उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा

Last Updated:

मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. इथं भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीला बहुमत मिळालं आहे. मात्र महापौर पदावरून मुंबईत सगळ्यात मोठा ट्विस्ट बघायला मिळत आहे.

News18
News18
राहुल झोरी, प्रतिनिधी मुंबई: मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. इथं भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीला बहुमत मिळालं आहे. भाजप ८९ जागांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर शिवसेना शिंदे गटाला २९ जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा ११४ चा आकडा पार केला आहे. पण सध्या शिवसेना शिंदे गटाच्या हॉटेल पॉलिटीक्समुळे दोन्ही पक्षात फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवलं आहे. शिंदेकडून अडीच वर्षे महापौरपद मिळावं, यासाठी वाटाघाटी केल्या जात असल्याची चर्चा आहे. त्यासाठी शिंदेंकडून दबाबतंत्राचा अवलंब केला जात आहे. अशात ठाकरे गटाकडून मोठी खेळी केल्याची माहिती आहे. ठाकरे गटानं पडद्याआडून भाजपला पाठिंबा देण्यास सकारात्मकता दाखवल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
भारतीय जनता पक्ष जर मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करत असेल, तर त्याला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा असेल, अशी भूमिका उद्धव ठाकरेंकडून घेतल्याची माहिती आहे. याबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजप- शिंदे गटाच्या युतीला बहुमत मिळालं असलं तरी महापौर पदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचामुळे मोठा ट्विस्ट बघायला मिळत आहे.
advertisement
भाजप सत्ता स्थापणं करत असल्यास ठाकरे गट भाजपच्या पाठीशी राहणार आहे. महापौर निवडणूकीच्या वेळी ठाकरे गटाचे नगरसेवक अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाचे नगरसेवक गैरहजर राहिले, तर साहजिकच बहुमताचा आकडा ११४ वरून ८२ पर्यंत येऊ शकतो. अशात भाजपकडे ८९ नगरसेवक असल्याने इथं भाजपची एकहाती सत्ता येऊ शकते. शिवसेनेच्या जुन्या शिवसैनिकाला महापौर पदाची संधी मिळू शकते, अशी देखील चर्चा आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BREAKING: मुंबई महापौर पदावरून सगळ्यात मोठा ट्विस्ट, उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement