दोन हायस्पीड ट्रेनची एकमेकांना धडक, 21 प्रवाशांचा करुण अंत, डब्यांचा झाला चुरा

Last Updated:
स्पेनच्या कॉर्डोबा शहरात मलागा आणि माद्रिद दरम्यान दोन हाय-स्पीड ट्रेनची भीषण धडक झाली. २१ मृत, १०० हून अधिक जखमी, पेड्रो सांचेज यांनी शोक व्यक्त केला.
1/6
एका बाजूला हाय-स्पीड ट्रेनचा वेगवान प्रवास आणि दुसरीकडे प्रवाशांच्या डोळ्यांत घर गाठण्याची ओढ असताना दबा धरुन बसलेल्या काळानं घात केला. स्पेनमधील कॉर्डोबा शहरात रविवारी नियतीने असा काही खेळ मांडला की, अवघ्या काही सेकंदात दोन ट्रेनचा चुराडा झाला.

advertisement
2/6
मलागा आणि माद्रिद दरम्यान धावणाऱ्या दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकांवर जोरात आदळल्या. या भीषण अपघातात आतापर्यंत २१ प्रवाशांनी जीव गमावला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात 100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

3/6
हा अपघात इतका भयानक होता की, दोन्ही गाड्यांच्या इंजिनांचा अक्षरशः चुराडा झाला. डबे एखाद्या कागदासारखे दुमडले गेले होते. घटनास्थळी जेव्हा बचाव पथक पोहोचलं, तेव्हा तिथलं दृश्य पाहून अनुभवी जवानांच्याही काळजाचा ठोका चुकला.

4/6
डब्यांमध्ये अडकलेल्या जखमींच्या ओरडण्याचे आवाज येत होते, पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधी समोर पडलेले मृतदेह बाजूला करावे लागत होते. १०० हून अधिक प्रवासी जखमी असून अनेकांची अवस्था अतिशय गंभीर आहे.

5/6
विशेष म्हणजे ज्या ट्रॅकवर ही घटना घडली, तो भाग एकदम सरळ होता आणि त्याचं नूतनीकरण होऊन जेमतेम सहा महिने झाले होते. एका वळणावर मलागावरून जाणारी खाजगी ट्रेन रुळावरून घसरली आणि थेट दुसऱ्या ट्रॅकवर आली, त्याच क्षणी समोरून सरकारी कंपनीची रेनफे ट्रेन आदळली.

6/6
देशात शोककळा स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आमचा देश सध्या असह्य वेदनेतून जात आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. सध्या माद्रिदकडे जाणारी सर्व रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली असून, जखमींच्या मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement