VIDEO : साक्षी उड्या मारायला लागली, धोनी म्हणतो बस खाली, मोठी फजित झाली, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा हा सामना पाहण्यसाठी आज सेलिब्रिटींपासून अनेक दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. रोहित शर्मा, महेंद्र सिंह सारखे खेळाडू देखील आज वाखनेडेला उपस्थित होते.
Sakshi Dhoni Funny Video Viral : टी20 वर्ल्ड कपमध्ये वानखेडेवर रंगलेल्या अटीतटीच्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने अवघ्या 7 धावांनी इंग्लंडचा पराभव केला आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाने फायनलमध्ये एंन्ट्री मारली आहे. दरम्यान या सामन्यात साक्षी धोनीसोबत एक मजेशीर घटना घडली आहे. ही घटना पाहून सगळ्यांनाच हसू आवरता येत नाही आहे.
टीम इंडियाचा हा सामना पाहण्यसाठी आज सेलिब्रिटींपासून अनेक दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. रोहित शर्मा, महेंद्र सिंह सारखे खेळाडू देखील आज वाखनेडेला उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग यांची भेटही झाली होती. या भेटीचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. या सामन्या दरम्यान एक गोष्ट खूपच मजेशीर घडली होती. याचाच व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
advertisement
Bumrah took a catch on bump ball.
Sakshi thought it was out and started jumping.
Dhoni told her to calm down.
Moment hai bhai 😂❤️pic.twitter.com/i7o9AovFDo
— Garv (@mohalimonster) March 5, 2026
ही घटना 17 व्या ओव्हरला घडली होती. या ओव्हरचा पहिला बॉल जसप्रीत बुमराहने सॅम करनला ब्लॉकहोलला बॉल टाकला होता. हा बॉल मारताना तो बम्प झाला आणि बुमराहने बॉल कँच केला. यावेळी स्टेडिअममध्ये बसलेल्या साक्षी धोनीला वाटलं बुमराहने कॅच घेतली त्यामुळे ती एकट्याने जोरजोरात उड्या मारायला लागली. ही गोष्ट मागे उभा असलेला महेंद्रसिंह धोनी पाहत होता.त्यामुळे त्याने तिला लगेच बस खाली ती कॅच नव्हती हे समजावण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे साक्षी धोनीची मोठी फजिती झाली.या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
advertisement
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर टीम इंडियाने इंग्लंडसमोर 254 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सूरूवात खराब झाली होती. कारण इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट स्वस्तात बाद झाला होता.त्यानंतर कॅप्टन हॅरी ब्रुक मैदानात आला होता. पण तो देखील 7 धावांवर बाद झाला होता. सुरूवातीचे दोन विकेट पडल्यानंतर जॉस बटलर आणि जेकॉब बेथेलने इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण या दरम्यान बटलर 25 वर बाद झाला. त्यानंतर टॉम बॅन्टन 17 वर बाद झाला.
advertisement
इंग्लंडचे एका मागून एक विकेट पडत असताना जॅकॉब बेथेलने डाव सावरला होता. त्याच्या जोडीला विल जॅक्स देखील मैदानात होता. पण तो 20 बॉलमध्ये 35 धावा करून बाद झाला होता. इंग्लंडला शेवटच्या ओव्हरला 6 बॉलमध्ये 30 धावांची गरज होती. यावेळी इंग्लंडकडून एकाकी झूंज देणारा जेकॉब बेथल रनआऊट झाला होता. त्याने सर्वाधिक 48 बॉलमध्ये 105 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 7 षटकार आणि 8 चौकार लगावले होते. या विकेटनंतरच अख्खी मॅच फिरली. कारण इंग्लंड फक्त 247 धावांपर्यंतच मजल मारू शकली होती.त्यामुळे भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला होता.
advertisement
संजू सॅमसनने 42 बॉलमध्ये 89 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. त्याच्या जोडीला शिवम दुबेने 43 धावा ठोकल्या होत्या. या धावांच्या बळावर भारताने 20 ओव्हरमध्ये 257 धावा केल्या होत्या.
दरम्यान भारताने हा सामना जिंकल्याने ते फायनला पोहोचले होते. तर बुधवारी साऊथ आफ्रिकेचा पराभव करून न्यूझीलंड फायनलला पोहोचली होती. त्यामुळे आता 8 मार्चला 2026 ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप फायनलची लढत होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 12:10 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : साक्षी उड्या मारायला लागली, धोनी म्हणतो बस खाली, मोठी फजित झाली, नेमकं काय घडलं?







