नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी, टिळकवाडीतील रस्ता आजपासून बंद, पर्यायी मार्ग कोणता?

Last Updated:

प्रशासनाने कामाची मुदत एक वर्ष दिली असली, तरी या कासवगती कामामुळे रोज 30 ते 40 हजार नागरिकांना मोठा फटका बसणार असून, अवघ्या अर्ध्या किलोमीटरसाठी आता तब्बल एक किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे.

News18
News18
नाशिक : शहराच्या मध्यवस्तीतील अत्यंत गजबजलेला टिळकवाडी येथील तरणतलाव ते राजीव गांधी भवन हा 500 मीटरचा रस्ता आजपासून (दि. 19) काँक्रिटीकरणासाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने कामाची मुदत एक वर्ष दिली असली, तरी या कासवगती कामामुळे रोज 30 ते 40 हजार नागरिकांना मोठा फटका बसणार असून, अवघ्या अर्ध्या किलोमीटरसाठी आता तब्बल एक किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे.
वाहतुकीचे चक्रव्यूह आणि मनस्ताप
हा रस्ता केवळ रहिवाशांसाठीच नाही, तर शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापाऱ्यांसाठी जीवनवाहिनी आहे. रस्ता बंद झाल्यामुळे आता धामणकर कॉर्नर, शरणपूर सिग्नल, मायको सर्कल आणि गडकरी चौक या आधीच गजबजलेल्या भागांवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण येणार आहे. यामुळे सकाळ-संध्याकाळ वाहनधारकांना भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
advertisement
व्यापाऱ्यांची चिंता, नागरिकांचा अविश्वास
प्रशासनाने अंतर्गत रस्ते खुले ठेवले असले तरी अवजड वाहनांना बंदी घातली आहे. परिणामी, स्थानिक व्यावसायिकांच्या मालवाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अधिकाऱ्यांनी काम लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिले असले, तरी नाशिककरांचा अनुभव वेगळा आहे. यापूर्वीची अनेक कामे रखडल्याने प्रशासनाच्या शब्दावर विश्वास कसा ठेवायचा? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
advertisement
कसा असेल वाहतुकीचा नवा मार्ग?
काँक्रिटीकरणाचे काम दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात टिळकवाडी सिग्नल ते हॉटेल सिटी प्राइज या कालावधीत टिळकवाडीकडून जलतरण सिग्नलकडे जाणारी वाहतूक राणे डेअरी, राका कॉलनी किंवा कुलकर्णी गार्डन मार्गे होलाराम कॉलनीतून मायको सर्कलकडे वळविण्यात येईल, तर दुसऱ्या टप्प्यात हॉटेल सिटी प्राइड ते जलतरण सिग्नल या टप्प्यात सिटी प्राइड टी-पॉइंटवरून उजवीकडे वळण घेऊन वाहतूक होलाराम कॉलनी मार्गे वळविण्यात येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/नाशिक/
नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी, टिळकवाडीतील रस्ता आजपासून बंद, पर्यायी मार्ग कोणता?
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement