लोकांनी नावं ठेवली! फुलटाइम नोकरीसोबत दोन भावांनी सुरू केली भन्नाट शेती, करताय लाखोंची कमाई

Last Updated:

Farmer Success Story : एखादं स्वप्न पाहायला मोठी शेती, डोंगरदऱ्या किंवा अफाट भांडवल लागतंच असं नाही, हे आजचे तरुण आपल्या कृतीतून दाखवून देत आहेत.

success story
success story
मुंबई : एखादं स्वप्न पाहायला मोठी शेती, डोंगरदऱ्या किंवा अफाट भांडवल लागतंच असं नाही, हे आजचे तरुण आपल्या कृतीतून दाखवून देत आहेत. मेहनत, जिद्द आणि योग्य माहिती असेल, तर घराच्या एका खोलीतूनही सोन्यासारखं मूल्य असलेलं पीक घेता येतं. केशर हा शब्द ऐकताच काश्मीरची आठवण येते, मात्र आता हे चित्र बदलत आहे. देशातील शेतकरी आणि तरुण उद्योजक घरच्या चार भिंतींत केशराची शेती करून नवा इतिहास घडवत आहेत. पंजाबमधील सोमिल गुंबर आणि रघु गुंबर या दोन भावांची कहाणी याच बदलाची साक्ष देणारी आहे.
नोकरीसोबत व्यवसायाचा ध्यास
श्री मुक्तसर साहिब येथील रहिवासी असलेले सोमिल आणि रघु गुंबर हे दोघेही पूर्णवेळ नोकरी करत होते. मात्र वाढत्या खर्चामुळे आणि भविष्यासाठी सुरक्षित उत्पन्नाचा विचार करताना त्यांनी नोकरीसोबत करता येईल असा व्यवसाय शोधण्यास सुरुवात केली. अनेक पर्यायांचा अभ्यास केल्यानंतर त्यांचे लक्ष केशर लागवडीकडे गेले. संशोधनादरम्यान त्यांना धक्कादायक बाब समजली. भारतामध्ये केशराची एकूण मागणीपैकी केवळ ३० टक्के उत्पादन काश्मीरमधून पूर्ण होते, तर उर्वरित ७० टक्के केशर परदेशातून आयात करावे लागते.
advertisement
संधी ओळखून घेतलेला धाडसी निर्णय
ही मोठी तफावत लक्षात येताच त्यांनी या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. केवळ कल्पनेवर न थांबता, त्यांनी काश्मीर विद्यापीठातून घरातील केशर लागवडीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. हवामान, तापमान, आर्द्रता आणि योग्य पद्धतीने केशर कसे पिकवायचे, याची सखोल माहिती त्यांनी आत्मसात केली. त्यानंतर त्यांनी आपल्या घरातील एका खोलीत केशर लागवडीचा प्रयोग सुरू केला.
advertisement
सुरुवातीची गुंतवणूक आणि समाजाची प्रतिक्रिया
या उपक्रमासाठी त्यांनी सुमारे पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली. केशर बियाणे, शीतगृह, चिलर युनिट, रॅक आणि ट्रे अशा आधुनिक सुविधांसह त्यांनी एक सुसज्ज सेटअप उभारला. मात्र या वाटचालीत त्यांना समाजाकडून फारसा पाठिंबा मिळाला नाही. अनेकांनी त्यांच्या निर्णयाची खिल्ली उडवली, तर काहींनी “घरात केशर पिकतं का?” असे टोमणेही मारले. तरीही, सोमिल आणि रघु यांनी आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवून पुढे जाणे पसंत केले.
advertisement
यशाची फळं आणि नवी ओळख
दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर त्यांनी यशस्वीपणे केशर उत्पादन करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आज त्यांचे केशर दर्जेदार असून बाजारात चांगल्या किमतीला विकले जाते. इतकेच नव्हे, तर पंजाबसह देशाच्या विविध भागांतून लोक केशर लागवडीचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधत आहेत.
तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण
आज सोमिल गुंबर आणि रघु गुंबर केवळ केशर उत्पादक नाहीत, तर अनेक तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. नोकरीच्या शोधात गाव सोडणाऱ्या तरुणांना ते प्रशिक्षण देत असून, घरबसल्या रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत आहेत. त्यांच्या या प्रवासाने हे सिद्ध केले आहे की योग्य ज्ञान, धैर्य आणि कष्ट यांच्या जोरावर शेतीला आधुनिक आणि फायदेशीर व्यवसायात रूपांतरित करता येते.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
लोकांनी नावं ठेवली! फुलटाइम नोकरीसोबत दोन भावांनी सुरू केली भन्नाट शेती, करताय लाखोंची कमाई
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement