advertisement

US-Israel War: मिसाईल हल्ल्यात कोल्हापूरचा सुपुत्र थोडक्यात बचावला, क्रूड ऑईल टँकरवर भीषण हल्ला; एका हुशारीने महाभयंकर स्फोट टळला

Last Updated:

रोहित पाटील यांच्यासह जहाजावरील सर्व 23 कर्मचारी सुखरूप असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे.

News18
News18
कोल्हापूर : अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू असताना दुसरीकडे आता पाण्यातही युद्धाच्या ज्वाळा पोहचू लागल्या आहेत. आखाती देशांतील युद्धाचा भडका आता व्यापारी जहाजांपर्यंत पोहोचला असून इराकवरून अमेरिकेच्या दिशेने निघालेल्या 'SONANGOL NAMIBE' या कच्च्या तेलाच्या (Crude Oil) जहाजावर भीषण मिसाईल हल्ला झाला आहे. विशेष म्हणजे, या जहाजावर कोल्हापूरचा सुपुत्र ऑफिसर रोहित राजेंद्र पाटील हा मरीन इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. या भीषण हल्ल्यात जहाजाचे मोठे नुकसान झाले असून, रोहित पाटील यांच्यासह जहाजावरील सर्व 23 कर्मचारी सुखरूप असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे.
'SONANGOL NAMIBE' हे जहाज इराक मधल्या खोर अल जुबैर (Khor Al Zubair) बंदरातून कच्च्या तेलाची वाहतूक करण्यासाठी अमेरिकेच्या (USA) दिशेने निघाले होते. प्रवासादरम्यान अज्ञात ठिकाणाहून या जहाजावर क्षेपणास्त्र (Missile) डागण्यात आले. हा हल्ला इतका भीषण होता की जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने हे जहाज तेल उतरवून निघाले होते जर जहाजात कच्च्या तेलाचा साठा असता, तर मोठा स्फोट झाला असता, अशी भीती वर्तवण्यात आली आहे.
advertisement

23 कर्मचारी सुरक्षित

जहाजावर कोल्हापूरचे रोहित राजेंद्र पाटील हे इंजिनिअर ऑफिसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. हल्ल्याची बातमी समजताच कोल्हापुरात त्यांच्या कुटुंबाची आणि मित्रपरिवाराची मोठी धाकधूक वाढली होती. मात्र, रोहित पवार यांनी सुखरूप असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व 23 कर्मचारी सुरक्षित आहेत. सध्या या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली सुरू आहेत.
advertisement

खलाशी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

इराक आणि आसपासच्या सागरी क्षेत्रात व्यापारी जहाजांना लक्ष्य केले जात असल्याने भारतीय खलाशी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नौदल आणि संबंधित यंत्रणा या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. रोहित पाटील यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी हलवण्यात येईल, असे आश्वासन कंपनी आणि दूतावासाकडून देण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
US-Israel War: मिसाईल हल्ल्यात कोल्हापूरचा सुपुत्र थोडक्यात बचावला, क्रूड ऑईल टँकरवर भीषण हल्ला; एका हुशारीने महाभयंकर स्फोट टळला
Next Article
advertisement
How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement