advertisement

'विरोश'च्या रिसेप्शनला लागलं गालबोट? गेटवरच झाली धक्काबुक्की; बाउंसर्सने थेट उचलून बाहेर काढलं, नेमकं काय घडलं?

Last Updated:

Rashmika-Vijay Receptions Viral Video: सध्या या तरुणाचा हा फजितीचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

News18
News18
हैदराबाद : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील पॉवर कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची धामधूम अजूनही सुरू आहे. २६ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर, काल ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये या जोडीने एक ग्रँड रिसेप्शन पार्टी दिली. या सोहळ्याला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गजांची मांदियाळी होती. याच गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञाताने या हाय-प्रोफाइल लग्नात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचं नशीब इतकं फुटकं की बाउंसरच्या नजरेतून तो सुटू शकला नाही आणि त्याला तिथून मान खाली घालून बाहेर पडावं लागलं.
रिसेप्शनच्या ठिकाणी सेलिब्रिटींची ये-जा सुरू असताना, एक तरुण अतिशय सभ्य आणि डिसेंट कपडे घालून पाहुण्यांच्या गर्दीत मिसळला. त्याने असा गेटअप केला होता की कोणालाही संशय येऊ नये की तो निमंत्रित नाही. पण रिसेप्शनच्या गेटवर तैनात असलेल्या कडक बाउन्सर्सनी त्याचा चेहरा वाचला आणि तो या सोहळ्याचा अधिकृत पाहुणा नसल्याचं त्यांच्या लगेच लक्षात आलं.
advertisement

बाउन्सर्सने धक्के मारून काढलं बाहेर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, हा तरुण बाउन्सर्सना काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण बाउन्सर्सनी त्याचं काहीही न ऐकता त्याला चक्क उचलून गेटच्या बाहेर काढलं. एका क्षणात त्या तरुणाचा प्लॅन फसला आणि त्याला तिथून काढता पाय घ्यावा लागला. सध्या या तरुणाचा हा फजितीचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
advertisement












View this post on Instagram























A post shared by India Forums (@indiaforums)



advertisement

दिग्गजांची हजेरी अन् 'हिंदी-साउथ'चा मिलाफ

या रिसेप्शनला केवळ साउथच नाही तर हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील बड्या नावांनीही हजेरी लावली होती. एका बाजूला महेश बाबू, अल्लू अर्जुन, राम चरण, नागार्जुन आणि चिरंजीवी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपल्या कुटुंबासह विरोशला आशीर्वाद दिले. तर दुसरीकडे बॉलिवूडमधून करण जोहर, कृती सेनन, नीना गुप्ता, मृणाल ठाकूर आणि रिया चक्रवर्ती यांनीही सोहळ्याची शोभा वाढवली.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'विरोश'च्या रिसेप्शनला लागलं गालबोट? गेटवरच झाली धक्काबुक्की; बाउंसर्सने थेट उचलून बाहेर काढलं, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement