advertisement

Navi Mumbai: नवी मुंबईत खासगी कोचिंग क्लासमध्ये स्लॅब कोसळला, 5 विद्यार्थी जखमी

Last Updated:

मोठा आवाज झाल्यामुळे सोसायटीतील इतर लोकांना लगेच धाव घेतली. स्लॅबखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आलं.

News18
News18
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी
नवी मुंबई: नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोपरखैरणेमधील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये इमारतीची स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. या स्लॅबखाली १८ विद्यार्थी अडकले. तातडीने १० विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं आहे. ढिगाराखी आणखी ५ विद्यार्थी अडकले होते, पण वेळीत त्यांनाही बाहेर काढण्यात आलं आहे. याा दुर्घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार,   कोपरखैरणेतील विद्याभवन सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. या सोसायटीमध्ये तळमजल्यावर एका खाजगी कोचिंग क्लास सुरू होता.   क्लास सुरू असताना अचानक पहिल्या मजल्यावर असलेल्या घराचा संपूर्ण स्लॅब कोसळला.  स्लॅब जेव्हा कोसळला तेव्हा क्लासमध्ये या १८ विद्यार्थी होते.  स्लॅब खाली १८ विद्यार्थी अडकले होते. सुरुवातीला १८ पैकी 10 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
[video width="848" height="478" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-05-at-18.51.29-2026-03-1e2712d000add8f57bb3beb88c7bc999.mp4"][/video]
मोठा आवाज झाल्यामुळे सोसायटीतील इतर लोकांना लगेच धाव घेतली. स्लॅबखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. यामध्ये काही विद्यार्थी हे  जखमी झाले होते. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोपरखैरणे येथील अपेक्स आणि साई स्नेहदीप रुग्णालयात विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल केलं आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेळीच जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं.   घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले आहे.
advertisement
मात्र, या घटनेमुळे नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा मुद्या ऐरणीवर आला आहे. नवी मुंबई पालिकेनं अनेक अशा धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. पण, अशा धोकादायक इमारतींमध्ये अजूनही नागरिक जीव मुठीत धरून वास्तव्यास असल्याचं समोर आलं आहे. त्याामुळे पालिका अशा धोकादायक इमारतींवर कधी कारवाई करणार हे पाहण्याचं ठरणार आहे,.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai: नवी मुंबईत खासगी कोचिंग क्लासमध्ये स्लॅब कोसळला, 5 विद्यार्थी जखमी
Next Article
advertisement
How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement