Ac Local Train : हार्बर मार्गावर एसी लोकलचे काउंटडाउन सुरू; पाहा कोणत्या वेळेत सुटणार नवीन ट्रेन
Last Updated:
AC Local Timetable : 26 जानेवारीपासून हार्बर मार्गावर एसी लोकल पुन्हा सुरू होत असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवरही एसी लोकलच्या 12 अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
हार्बर मार्गावर पुन्हा एकदा एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून सीएसएमटी,वडाळा रोड ते पनवेल या मार्गावर 14 एसी लोकल फेऱ्या धावणार आहेत. मात्र या एसी लोकलसाठी काही सामान्य लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार असल्याने नियमित प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
advertisement
याआधी 1 डिसेंबर 2021 रोजी हार्बर मार्गावर पहिल्यांदा एसी लोकल सुरू करण्यात आली होती. मात्र सामान्य लोकलच्या तुलनेत एसी लोकलचे तिकीट आणि पासचे दर जास्त असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. त्यातच सामान्य लोकलच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अखेर हार्बर मार्गावरील एसी लोकल पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







