आधी बाबा, आता मुलगा! सरवणकर फॅमिलीला घरी बसवण्यामागे भाजप टोळीचा हात? SPECIAL REPORT
- Published by:Sachin S
Last Updated:
समाधान यांनी या पराभवासाठी भाजपला जबाबदार धरल्यानं महायुतीत आता ब्लेमगेम सुरू झाला का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
मुंबईच्या महापौरपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आता दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये वादाचे फटाके फुटू लागले आहेत. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 194 मधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा पराभव झाला. ठाकरेंच्या शिवसेनेचे निशिकांत शिंदे या प्रभागातून विजयी झाले आहेत. या पराभवानंतर समाधान सरवणकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे. भाजपच्या स्थानिक टोळीमुळे माझा पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांना मुंबईत महापालिका निवडणुकीत पराभवाचं खापर युतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपवर फोडलंय. वॉर्ड क्रमांक 194 मध्ये समाधान सरवणकर यांचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशिकांत शिंदेंनी 582 मतांनी पराभव केला. भाजपमधील स्थानिक टोळीनं माझ्याविरोधात प्रचार केल्यानं माझा पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केला.
advertisement
विधानसभेतही सरवणकरांचा पराभव
लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात ठाकरेंच्या पक्षाच्या अनिल देसाईंनी शिवसेनेच्या राहुल शेवाळेंना धूळ चारली. तर विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या महेश सावंतांनी शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्यावर मात केली. शिवसेनेच्या या पराभवासाठीही भाजपची विशिष्ट टोळी काम करत होती, असा आरोप सरवणकरांनी केला आहे. माहिमच्या वॉर्ड क्रमांक 190 मधील भाजपच्या शीतल गंभीर आणि 191 मधील प्रिया सरवणकर यांच्या पराभवामागेही हीच टोळी असल्याचा आरोप समाधान सरवणकरांनी केला.
advertisement
बालेकिल्ल्यात सरवणकरांना धक्का
समाधान सरवणकर यांनी केलेल्या आरोपांचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. महापालिका निवडणुकीत दक्षिण आणि मध्य मुंबईतील आपले गड शाबूत राखण्यात ठाकरेंची शिवसेना यशस्वी ठरली आहे. यातील माहिम हा जसा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे, तसाच तो सदा सरवणकरांचाही बालेकिल्ला मानला जातो. 2004, 2014 आणि 2024 अशी तीन टर्म ते इथले आमदार म्हणून निवडून आले.
advertisement
मात्र, शिवसेना फुटल्यानंतर सरवणकर शिंदेंसोबत गेले अन् त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आधी विधानसभेत त्यांचा पराभव झाला त्यानंतर आता महापालिका निवडणुकीत त्यांची दोन्ही मुलं समाधान सरवणकर आणि प्रिया सरवणकर यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. समाधान यांनी या पराभवासाठी भाजपला जबाबदार धरल्यानं महायुतीत आता ब्लेमगेम सुरू झाला का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 11:45 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
आधी बाबा, आता मुलगा! सरवणकर फॅमिलीला घरी बसवण्यामागे भाजप टोळीचा हात? SPECIAL REPORT










