3 घरं, 3 ऑटो, एक स्विफ्ट आणि ड्रायव्हरही...! भारतातील करोडपती भिकारी, संपत्ती पाहून श्रीमंतांचेही डोळे चमकले
- Published by:Priya Lad
Last Updated:
Rich Beggar In India : भिकारी मांगीलाल... फक्त नावाने भिकारी. त्याच्या एक घर, तीन ऑटो आणि एक स्विफ्ट कार आहे. गाडी चालवायला एक ड्रायव्हरही आहे. ज्याला तो पगारही देतो. इतकंच नव्हे तर तो सराफा परिसरात भीक मागतो आणि सराफा म्हणजे सोनं-चांदीचा व्यापार करणाऱ्यांना व्याजाने पैसेही देतो.
लाकडी सरकरणारी गाडी, हातात चप्पल, पाठीवर बॅग आणि जिथं तिथं भीक मागत फिरणारी ही व्यक्ती. त्याची अवस्था अशी की त्याला पाहून लोकांना त्याची दया आलीच पाहिजे. त्यामुळे कित्येक लोक त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याला भीक देत होते. पण भीक मागून पैसे जमवणारा हा भिकारी प्रत्यक्षात करोडपती निघाला. त्याची संपत्ती पाहून भल्याभल्यांचे डोळे फिरले आहेत.
advertisement
advertisement
आता हा भिकारी आहे कुठला तर इंदौरच. सराफा परिसरात तो भीक मागताना दिसतो. इंदूर शहराला भिकारीमुक्त शहर बनवण्यासाठी महानगरपालिकेने एक मोठी मोहीम सुरू केली आहे. यादरम्यान सराफा बाजारातील या अपंग भिकाऱ्याबद्दल वारंवार तक्रारी येत होत्या. जेव्हा पथकाने त्याला पकडलं आणि त्याची संपत्ती तपासली तेव्हा अधिकारी थक्क झाले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तो आणि त्याचं कुटुंब एकत्र भीक मागायचे. त्यामुळे उत्पन्न जास्त होते. माहितीनुसार त्याच्या कुटुंबाला दरवर्षी 10 ते 15 लाख रुपये मिळत असत. भिक्षा निर्मूलन समितीचे नोडल अधिकारी दिनेश मिश्रा म्हणाले, मांगीलाल सराफा बाजार परिसरात फिरून भीक मागत असे, विशेषतः सोने-चांदी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून किंवा परदेशी ज्वेलर्सना भेट देणाऱ्या लोकांकडून. यामुळे त्याला चांगलं उत्पन्न मिळत असे. (प्रतीकात्मक फोटो)









