Sambhajinagar News : 2025 मध्ये ओळख, मग प्रेम, पोटात बाळ असताना; प्रियकराने प्रेयसीसोबत केलं भयानक कांड
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी संबंध ठेवले. ती गर्भवती झाल्यानंतर लग्नास नकार दिल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : प्रेमसंबंधातून तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला लग्नास नकार देत टाळाटाळ केल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यासह लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याच्या गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. स्वप्नील सुधाकर दांडगे (वय 22, रा. इच्छामणी हॉटेलसमोर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे.
ओळख वाढताच दोघांमध्ये प्रेम जुळले
पीडित 19 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी स्वप्नील याने तिला लग्नाचे आश्वासन देत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जानेवारी 2025 पासून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. या कालावधीत दोघांमध्ये दररोज मोबाईलवर सातत्याने संवाद होत असे. विश्वास निर्माण झाल्यानंतर आरोपीने रात्रीच्या वेळी मुकुंदवाडी येथील एका मैदानावर भेटण्यास बोलावून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
advertisement
गर्भवती झाल्यानंतर प्रियकराचे लग्नासाठी हात वर
या संबंधातून सुमारे तीन महिन्यांपूर्वी पीडिता गर्भवती राहिली. याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीने जबाबदारी स्वीकारण्याऐवजी तिला काही गोळ्या दिल्या. त्या गोळ्या घेतल्यानंतर पीडितेला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. प्रकृती खालावल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांनी ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट केले.
advertisement
दरम्यान गर्भधारणेची खात्री झाल्यानंतरही आरोपीने पीडितेशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला आणि तिला टाळाटाळ करू लागला. मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याने अखेर पीडित तरुणीने धैर्याने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यासह लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 9:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sambhajinagar News : 2025 मध्ये ओळख, मग प्रेम, पोटात बाळ असताना; प्रियकराने प्रेयसीसोबत केलं भयानक कांड








