advertisement

Team India : किर्ती आझादनंतर आता संजय मांजरेकरांचं वादग्रस्त विधान, टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाचा 'अपमान'!

Last Updated:

टीम इंडिया तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप विजेती बनल्याने संपूर्ण देश आनंद साजरा करत आहे, पण भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनी टीम इंडियाच्या विजयाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.

किर्ती आझादनंतर आता संजय मांजरेकरांचं वादग्रस्त विधान, टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाचा 'अपमान'!
किर्ती आझादनंतर आता संजय मांजरेकरांचं वादग्रस्त विधान, टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाचा 'अपमान'!
मुंबई : टीम इंडिया तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप विजेती बनल्याने संपूर्ण देश आनंद साजरा करत आहे. जगातील इतर कोणत्याही क्रिकेट टीमने तीन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही. भारताने 2007, 2024 आणि आता 2026 च्या फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून विजेतेपद जिंकले आहे. संपूर्ण देशाला या कामगिरीचा अभिमान आहे, तर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरसह काहींनी टीम इंडियाच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आपल्या विधानांमुळे अनेकदा वादात सापडलेल्या मांजरेकर यांनी टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर लिहिले आहे की, "कालांतराने, आपल्याला या वार्षिक जागतिक विजेतेपदांना दृष्टिकोनातून पहावे लागेल. आव्हान आणि प्रतिष्ठेच्या बाबतीत, 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेल्या वनडे वर्ल्ड कपपेक्षा टी-20 वर्ल्ड कप विजय तितके प्रभावी नाहीत', असं मांजरेकर म्हणाले आहेत.
advertisement
advertisement

किर्ती आझाद यांचंही वादग्रस्त विधान

याआधी भारताचे माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनीही वादग्रस्त विधान केलं होतं. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन हनुमान मंदिरात गेले, यावरून किर्ती आझाद यांनी निशाणा साधला.
'टीम इंडियाची लाज वाटते. आम्ही कपिल देवच्या नेतृत्वात 1983 चा वर्ल्ड कप जिंकलो, तेव्हा आमच्या टीममध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन खेळाडू होते. विजयानंतर आम्ही ट्रॉफी आमच्या धार्मिक जन्मभूमीमध्ये भारत, हिंदूस्तानमध्ये आणली. भारताची ट्रॉफी यामध्ये का ओढली जात आहे? मशीद का नाही? चर्च का नाही? गुरूद्वारा का नाही? ही टीम भारताचं प्रतिनिधीत्व करते, सूर्यकुमार यादव किंवा जय शाह यांच्या कुटुंबाचं नाही. सिराजने कधी मशिदीमध्ये ट्रॉफी नेली नाही, किंवा संजूने चर्चमध्ये ट्रॉफी नेली नाही. संजूने या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि तो स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू होता. ही ट्रॉफी प्रत्येक धर्माच्या भारतीयाची आहे, एका धर्माची नाही', अशी पोस्ट किर्ती आझाद यांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : किर्ती आझादनंतर आता संजय मांजरेकरांचं वादग्रस्त विधान, टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाचा 'अपमान'!
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement