advertisement

'एक दिवस तू सुद्धा फ्रिजमध्ये सापडशील', स्तुतीला मिळाला होता 'श्रद्धा वालकर' प्रकरणासारखा इशारा, पण...

Last Updated:

प्रेयसीचे तुकडे करून आरोपी आफताबने फ्रीजमध्ये ठेवले होते. याच प्रकरणाचा उल्लेख करत स्तुतीच्या मैत्रीणींनी अप्रत्यक्षपणे तिला सावधही केलं होतं.  

News18
News18
संकेत वरक, प्रतिनिधी
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एका २४ वर्षीय विद्यार्थिनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, आत्महत्येपूर्वी या तरुणीने ६ पानी सुसाईड नोट लिहिली होती. सुसाईड नोटमध्ये अप्रत्यक्षपणे श्रद्धा वालकर मर्डर केसचा उल्लेख असल्याचं आता समोर आला आहे. मृत तरुणीच्या मित्रमैत्रिणींकडून मस्करीत “एक दिवस तू आम्हाला फ्रिजमध्ये सापडशील” असं म्हटल्याचा उल्लेख सापडला आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अँटॉप हिल परिसरात ही घटना घडली.  MDS चे शिक्षण घेत असलेल्या २४ वर्षीय तरुणी स्तुती सोनवणे रुममध्ये गळफास लावून आपलं जीवन संपवलं.  तरुणीच्या मृतदेहाजवळ सहा पानी नोट आढळून आली आहे. या सुसाईट नोटमध्ये प्रियकर फझल मोहम्मद खान  याचा उल्लेख केला आहे. हा फझल खान आता श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारखा कनेक्ट होत आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. प्रेयसीचे तुकडे करून आरोपी आफताबने फ्रीजमध्ये ठेवले होते. याच प्रकरणाचा उल्लेख करत स्तुतीच्या मैत्रीणींनी अप्रत्यक्षपणे तिला सावधही केलं होतं.
advertisement
सुसाईट नोटमध्ये का लिहिलं?
घटनास्थळावरून सहा पानांची सुसाईड नोट सापडली आहे. सुसाईड नोटमध्ये प्रियंकराने गलिच्छ आणि चरित्र्यावर संशय निर्माण करणारे आरोप प्रेयसी स्तुती सोनावणे हिने केल्याचा दावा केला आहे.  मोहोम्मद फुझीयाल याचे स्तुतीसोबत संबंध असल्याचा संशय आहे. सुसाईड नोटनुसार सुरुवातीला दोघांमध्ये संबंध चांगले होते. पण काही दिवसांनी दोघांमध्ये वाद आणि भांडण होऊ लागले.  या भांडणांदरम्यान फझल मोहम्मद खानने स्तुतीच्याा चारित्र्यावर संशय घेत होता.
advertisement
'तू एक दिवस आम्हाला फ्रीजमध्ये सापडशील'
स्तुती आणि फझल यांच्यातील भांडणाची माहिती ही तिच्याा मैत्रीणींना होती. तिचे मित्र-मैत्रिणी टोमणे मारायचे. तरुणीच्या मित्रमैत्रिणींकडून मस्करीत 'एक दिवस तू आम्हाला फ्रिजमध्ये सापडशील' असे बोलले जात असल्याचा उल्लेखही सुसाईड नोटमध्ये केला आहे.
कोण आहे स्तुती सोनावणे? 
मृत स्तुती सोनवणे ही आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत एंटॉप हिलमध्ये राहत होती. नवी मुंबईतील एका डेंटल कॉलेजमध्ये MDS चे शिक्षण घेत होती.  मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजेपर्यंत खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. दरवाजा तोडून पाहिले असता विद्यार्थिनी नायलॉनची ओढणी वापरून गळफास घेतल्याचे समजलं. तिला तातडीने सायन रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
advertisement
प्रियकराला अटक
दरम्यान, स्तुतीने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वडिलांच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी या प्रकरणात फझल मोहम्मद खान ला अटक केली. आत्महत्येच्या आदल्यादिवशी फजल आणि स्तुतीचं बोलणं झालं होतं. या दोघांची ओळख एका डेटिंग अॅपवरुन झाली होती. मागील वर्षभरापासून दोघे एकमेकांच्या प्रेमसंबंधात होते. पण, फझल हा तिला कायम त्रास देत होता, अशी माहिती समोर आली आहेय या प्रकऱणी पोलिसांनी फझल विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.
advertisement
'सॉरी डॉक्टर बांगा'
दरम्यान, स्तुतीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये 'सॉरी डॉक्टर बांगा' असं देखील लिहिलं आहे. मयत स्तुती सोनवणे हिच्या पालकांची मागणी आहे की, डॉक्टर बांगा यांची देखील चौकशी व्हावी. गेली पाच वर्ष स्तुती डॉक्टर बांगा यांच्यासाठी काम करत असून ते स्तुतीला मानसिक त्रास द्यायचे, असा आरोप पालकांनी केला आहे. याच सोबत स्तुतीचं फझलसह ब्रेकअप होऊन ती आणखी एका मुलाच्या प्रेमात होती आणि त्याचं मुळे फझल हा देखील तीला त्रास देत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
'एक दिवस तू सुद्धा फ्रिजमध्ये सापडशील', स्तुतीला मिळाला होता 'श्रद्धा वालकर' प्रकरणासारखा इशारा, पण...
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement