Sanju Samson : वर्ल्ड कप जिंकवून घरी पोहोचला संजू, गेटच्या आत जाताच केली आईची इच्छा पूर्ण!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या तिन्ही नॉकआऊट सामन्यांमध्ये संजू सॅमसन हा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. संजू सॅमसनच्या मॅच विनिंग खेळींमुळे टीम इंडियाने लागोपाठ दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम केला.
तिरुवनंतपूरम : टी-20 वर्ल्ड कपच्या तिन्ही नॉकआऊट सामन्यांमध्ये संजू सॅमसन हा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. संजू सॅमसनच्या मॅच विनिंग खेळींमुळे टीम इंडियाने लागोपाठ दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम केला. वेस्ट इंडिजविरुद्धचा करो या मरो चा सामना, इंग्लंडविरुद्धची सेमी फायनल आणि न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये संजूने लागोपाठ 3 अर्धशतकं ठोकली, या कामगिरीबद्दल संजूला प्लेअर ऑफ द वर्ल्ड कप देऊन गौरवण्यात आलं.
टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संजू सॅमसन हा त्याच्या घरी पोहोचला. घरी जाताच संजूने त्याच्या आई-वडिलांना कडकडून मिठी मारली. स्वत: संजूने सोशल मीडियावर घरी पोहोचल्यानंतरच्या क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे.
advertisement
काय म्हणाली संजूची आई?
'मी फायनल सामना पाहत होते, संजूला रन करताना पाहिलं. मॅच संपल्यानंतर माझ्या मुलाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देण्यात आला, हे पाहून मला आणखी आनंद झाला', असं संजूची आई लिझ विश्वनाथ यांनी सांगितलं. संजूच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे संजूचे आई आणि वडील त्यांच्या घरातूनच सामना पाहत होते, तर संजूची पत्नी चारुलताने अहमदाबादच्या स्टेडियममध्ये बसून इतिहास घडताना पाहिला.
advertisement
फायनलआधी संजूचा आईला फोन
फायनलआधी संजूने आईला फोन करून तब्येतीची काळजी घ्यायला सांगितलं होतं. तसंच फायनलनंतर मुलगा घरी येईल तेव्हा त्याला कडकडून मिठी मारण्याची इच्छा आईने व्यक्त केली होती. संजू जसा घरी आला त्या क्षणी आईने मिठी मारून तिची इच्छा पूर्ण केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 10:32 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sanju Samson : वर्ल्ड कप जिंकवून घरी पोहोचला संजू, गेटच्या आत जाताच केली आईची इच्छा पूर्ण!










