advertisement

Mardaani 3 OTT Released: राणी मुखर्जीचा ‘मर्दानी 3’ ओटीटीवर पाहता येणार; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Last Updated:

‘मर्दानी 3’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवल्यानंतर आता ओटीटीवर प्रेक्षकांचं घरबसल्या मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर राणी मुखर्जीने थिएटरमध्ये जबरदस्त कमबॅक केलं आहे.

Mardaani 3 Collection: 12 वर्षांनतरही राणी मुखर्जीच्या 'मर्दानी'चा जलवा, 3 दिवसांत बॉक्स ऑफिसवर केली अफलातून कमाई; बजेटची अर्धी रक्कम वसूल
Mardaani 3 Collection: 12 वर्षांनतरही राणी मुखर्जीच्या 'मर्दानी'चा जलवा, 3 दिवसांत बॉक्स ऑफिसवर केली अफलातून कमाई; बजेटची अर्धी रक्कम वसूल
‘मर्दानी’ चित्रपटाच्या फ्रेंचायझीमध्ये पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयची मुख्य भूमिका साकारत अभिनेत्री राणी मुखर्जीने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. 30 जानेवारीला रिलीज झालेल्या ‘मर्दानी 3’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कामगिरी करत राणी मुखर्जीने थिएटरमध्ये जबरदस्त कमबॅक केलं आहे. बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवल्यानंतर आता ओटीटीवर प्रेक्षकांचं घरबसल्या मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. राणी मुखर्जीचा ‘मर्दानी 3’ कोणत्या ओटीटीवर आणि किती तारखेला रिलीज होणार आहे? जाणून घेऊया...
123 तेलुगुने दिलेल्या माहितीनुसार, राणी मुखर्जीचा ‘मर्दानी 3’ चित्रपट 27 मार्चला ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे ओटीटी राइट्स 'नेटफ्लिक्स' या ओटीटीकडे असून लवकरच हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार असल्याची माहिती रिपोर्टमध्ये आहे. दरम्यान, अद्याप चित्रपट नेमक्या ओटीटीवर रिलीज होणार आहे? याची माहिती अधिकृत समोर आलेली नाही. ज्या चाहत्यांनी ‘मर्दानी 3’ चित्रपट थिएटरमध्ये पाहिलेला नाही, त्यांना ओटीटीवर पाहण्याची संधी मिळेल. कोणताही चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्याच्या 8 आठवड्यांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जातो.
advertisement
‘मर्दानी 3’चे अभिराज मिनावाला यांनी दिग्दर्शन केले असून अभिनेत्री राणी मुखर्जीने चित्रपटामध्ये शिवानी शिवाजी रॉय नावाच्या एका पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. 3 महिन्यांमध्ये 93 तरूण युवतींचे अपहरण केले जाते, नेमकं त्या 93 मुलींचं कोणी अपहरण केलं? त्यांना अपहरण करून कुठे नेण्यात आलं? यासह अशा अनेक प्रश्नांचा उलगडा पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत अभिनेत्री करताना दिसणार आहे. चित्रपटाचे कथानक आयुष गुप्ता यांनी लिहिले असून यशराज फिल्म्सने निर्मिती केली आहे. राणी मुखर्जीसह जानकी बोदीवाला, जिस्सू सेनगुप्ता, इंद्रनील सेनगुप्ता सारखी तगडी स्टारकास्ट चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे.
advertisement
60 कोटींचा बजेट असलेल्या ‘मर्दानी 3’ने महिना ते सव्वा महिन्यात 51 कोटींची कमाई केलेली आहे. ‘मर्दानी 3’ तील राणी मुखर्जीच्या अभिनयाने अख्ख बॉलिवूड इम्प्रेस झालं आहे. चित्रपटाने 4 कोटींची ओपनिंग कमाई केलेली आहे. दुसऱ्या दिवशी 6.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 7.25 कोटी आणि चौथ्या दिवशी 2.25 कोटींची कमाई केली होती. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 26.5 कोटींची कमाई, दुसऱ्या आठवड्यात 15.65 कोटींची कमाई, तिसऱ्या आठवड्यात 5.35 कोटींची कमाई, चौथ्या आठवड्यात 2.52 कोटींची कमाई, आणि पाचव्या आठवड्यात 1.45 कोटींची कमाई कमाई केली. बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई केल्यानंतर आता चाहते चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mardaani 3 OTT Released: राणी मुखर्जीचा ‘मर्दानी 3’ ओटीटीवर पाहता येणार; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement