WPL : मुंबई इंडियन्सच्या सामन्यात Live ड्रामा, गोंधळलेल्या थर्ड अंपायरचा चक्रावणारा निर्णय, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
डब्ल्यूपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या सामन्यात अंपायरच्या निर्णयावरून मोठा वाद झाला आहे.
बडोदा : डब्ल्यूपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या सामन्यात अंपायरच्या निर्णयावरून मोठा वाद झाला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 7 विकेटने पराभव केला आहे. बडोद्यामध्ये झालेल्या या सामन्यात मुंबईने पहिले बॅटिंग करताना 154 रन केले, या आव्हानाचा पाठलाग दिल्लीने 6 बॉल शिल्लक असताना 7 विकेट राखून केला. दिल्लीची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जने 51 रनची अर्धशतकी खेळी केली, तर लिझेल ली च्या स्टम्पिंगवरून सामन्यात मोठा वाद झाला.
पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या नॅट सायवर ब्रंटने नाबाद 65 रन केले, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 41 रनचं योगदान दिलं. मुंबईविरुद्धच्या या सामन्यात विजय मिळवून दिल्लीने त्यांचं प्ले-ऑफचं आव्हान कायम ठेवलं आहे. RCB ने लागोपाठ 5 मॅच जिंकून आधीच प्ले-ऑफमधलं स्थान निश्चित केलं आहे.
Even with all the tech we have on Cricket, it is still not enough. Lizelle Lee given out.
The question is about the tech and not about the decision.#wpl pic.twitter.com/Gw96rIBTlb
— Anand L (@kharshad0) January 20, 2026
advertisement
मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या दिल्लीकडून शफाली वर्मा आणि लिझेल ली यांनी धमाकेदार सुरूवात केली. दोघींमध्ये 63 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली. शफाली वर्मा 29 रन करून आऊट झाली, तर 11 व्या ओव्हरमध्ये लिझेल ली च्या स्टम्पिंगवरून गोंधळ झाला. लिझेल ली खेळत असताना विकेट कीपरने स्टम्पिंगसाठी अपील केलं, यानंतर लेग अंपायरने थर्ड अंपायरकडे निर्णय पाठवला. रिप्ले पाहिल्यानंतर एका एँगलमध्ये लिझेलची बॅट जमिनीला टेकलेली वाटत होती, तर दुसऱ्या एँगलमध्ये बॅट हवेत दिसत होती. अखेर थर्ड अंपायरने बराच वेळ घेतल्यानंतर लिझेलला आऊट दिलं.
advertisement
पॉईंट्स टेबलमध्ये बदल
या सामन्याच्या आधी दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर होती, पण आता मुंबईचा 7 विकेटने पराभव केल्यानंतर दिल्लीचे 5 सामन्यांमध्ये 2 विजयांसह 4 पॉईंट्स झाले आहेत. दिल्लीची टीम आता टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर गुजरात शेवटच्या क्रमांकावर आहे. या पराभवामुळे मुंबईचं पॉईंट्स टेबलमध्ये नुकसान झालं नसलं, तरी त्यांच्या नेट रनरेटला मात्र धक्का बसला आहे.
Location :
Vadodara,Gujarat
First Published :
Jan 20, 2026 11:41 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
WPL : मुंबई इंडियन्सच्या सामन्यात Live ड्रामा, गोंधळलेल्या थर्ड अंपायरचा चक्रावणारा निर्णय, Video






