Saina Nehwal Retirement : ऑलिम्पिक स्टार 'फुलराणी'ने अखेर जाहीर केली निवृत्ती, पॉडकास्टमध्ये गौप्यस्फोट! 35 वर्षाच्या प्रवासाला ब्रेक

Last Updated:

Saina Nehwal confirms retirement : सायना म्हणाली की, तिला कधीही अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा करण्याची गरज वाटली नाही कारण तिला वाटले की, तिच्या अनुपस्थितीमुळे सर्व काही स्पष्ट होईल.

Saina Nehwal confirms retirement
Saina Nehwal confirms retirement
Saina Nehwal retire From badminton : देशाची दिग्गज खेळाडू आणि ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती कोर्टपासून दूर होती, मात्र सोमवारी तिने आपल्या या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. सायना गेल्या अनेक काळापासून गुडघ्याच्या गंभीर दुखापतीने त्रस्त होती. एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिनं स्पष्ट केलं की, तिचे शरीर आता उच्च स्तरावरील खेळाचा ताण सहन करण्यास सक्षम नाही. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या सायनाने 2023 च्या सिंगापूर ओपनमध्ये आपली शेवटचा मॅच खेळली होती.
सायना म्हणाली की तिला कधीही अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा करण्याची गरज वाटली नाही कारण तिला वाटले की तिच्या अनुपस्थितीमुळे सर्व काही स्पष्ट होईल. ती म्हणाली, "हळूहळू, लोकांना समजेल की सायना खेळत नाही. मला वाटत नाही की माझी निवृत्ती जाहीर करणे ही एक मोठी समस्या आहे. मला वाटले की माझी वेळ आली आहे कारण मी स्वतःला जास्त दबाव आणू शकत नाही. माझा गुडघा त्या स्थितीत नाही."
advertisement
सायनाच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये खीळ बसली होती. त्यावेळी तिला गुडघ्याची गंभीर दुखापत झाली होती. तरीही जिद्दीने पुनरागमन करत तिने 2017 मध्ये जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्य आणि 2018 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले. मात्र, ही दुखापत पुन्हा पुन्हा उफाळून येत होती, ज्यामुळे तिला सरावात अडचणी येत होत्या.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by @yashfitness_official



advertisement
2024 मध्ये सायनाने एक धक्कादायक खुलासा केला होता. तिला गुडघ्याचा संधिवात (आर्थराइटिस) असून त्यातील कार्टिलेज पूर्णपणे घासले गेले आहे. अशा परिस्थितीत बॅडमिंटनसारख्या वेगवान खेळात टिकून राहणे तिच्यासाठी अशक्य झाले होते. "मी माझ्या अटींवर खेळात आले आणि स्वतःच्याच निर्णयाने बाहेर जात आहे," असे भावनिक उद्गार तिने यावेळी काढले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Saina Nehwal Retirement : ऑलिम्पिक स्टार 'फुलराणी'ने अखेर जाहीर केली निवृत्ती, पॉडकास्टमध्ये गौप्यस्फोट! 35 वर्षाच्या प्रवासाला ब्रेक
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement