advertisement

Ground Report : युद्ध आखातात, झळ महाराष्ट्राला, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक... नागरिकांचे बेहाल, काय आहे सध्याची स्थिती?

Last Updated:
आखाती देशांतील या संघर्षामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे त्यामुळे संपूर्ण भारताला आता याला तोंड द्यावं लागणार आहे, महाराष्ट्राचीही परिस्थीती काही वेगळी नाही येथील प्रमुख शहरांमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
1/11
तिकडे दुसऱ्या देशात युद्ध सुरु आहे तर जाऊदे आपल्याला काय? असं म्हणणाऱ्याला आता खडबडून जागं होण्याची वेळ आली आहे, कारण इस्रायल-इराण युद्धाची झळ आता समुद्रापार असलेल्या महाराष्ट्राला बसू लागली आहे. आखाती देशांतील या संघर्षामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे त्यामुळे संपूर्ण भारताला आता याला तोंड द्यावं लागणार आहे, महाराष्ट्राचीही परिस्थीती काही वेगळी नाही येथील प्रमुख शहरांमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. कुठे चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे, तर कुठे गॅससाठी मारामारी होतोय. पहा महाराष्ट्रातील विविध शहरांतील विदारक वास्तव...

2/11
नाशिक : 24 तासात 80 टक्के हॉटेल बंदनाशिक शहरातील हॉटेल व्यवसायिकांना केवळ काही तास पुरेल इतकाच गॅस शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. येथे 24 तासात जर ही परिस्थिती सुधारली नाही तर शहरातील आणि जिल्ह्यातील 80 टक्के हॉटेल बंद पडतील अशी माहिती नाशिक हॉटेल व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिली आहे, कमर्शियल सिलेंडर पूर्णपणे देणे बंद न करता रेशनिंग पद्धतीने हा पुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी केली आहे अन्यथा हजारो कर्मचाऱ्यांवर आणि व्यवसाय कॉर्नर उपासमारीची वेळ येईल अशी भीती व्यक्त केली आहे.

3/11
पंढरपूर: विठुरायाच्या नगरीत गॅससाठी लांबच लांब रांगापंढरपुरात सध्या घरपोच गॅस सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. गॅस संपल्यामुळे नागरिक स्वतः सिलिंडर घेऊन गॅस एजन्सीबाहेर तासनतास रांगेत उभे राहत आहेत. प्रशासनाने गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी 'भरारी पथके' नेमली असली, तरी चूल पेटवण्यासाठी सर्वसामान्यांची मोठी कसरत सुरू आहे.

4/11
नागपूर LPG च्या तुटवड्यामुळे नागपुरातील हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कमर्शियल सिलेंडर उपलब्द होत नसल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत. अनेक हॉटेल मध्ये आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारी पर्यंत पुरेल इतकाच LPG साठा शिल्लक. हॉटेल इसेनशियल इंडस्ट्री असल्याने सरकार ने हॉटेलला सिलेंडर उपलब्ध करून घ्यावे. सिलेंडर पुरवठा सुरळीत न झाल्यास उद्या पासून शहरातील 90 टक्के हॉटेल बंद पडणार असं सांगण्यात येत आहे.
नागपूरLPG च्या तुटवड्यामुळे नागपुरातील हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कमर्शियल सिलेंडर उपलब्द होत नसल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत. अनेक हॉटेल मध्ये आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारी पर्यंत पुरेल इतकाच LPG साठा शिल्लक. हॉटेल इसेनशियल इंडस्ट्री असल्याने सरकार ने हॉटेलला सिलेंडर उपलब्ध करून घ्यावे. सिलेंडर पुरवठा सुरळीत न झाल्यास उद्या पासून शहरातील 90 टक्के हॉटेल बंद पडणार असं सांगण्यात येत आहे.
advertisement
5/11
धाराशिव: 25 दिवसांची वेटिंग आणि 60 रुपयांची दरवाढधाराशिवमध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे. केंद्र सरकारने गॅसच्या किमतीत 60 रुपयांची वाढ केली आहे, एकदा गॅस बुक केल्यानंतर तो मिळण्यासाठी तब्बल 25 दिवस वाट पाहावी लागत आहे. कडक उन्हाळा आणि सुट्ट्यांच्या काळात गॅसची मागणी वाढलेली असताना या नवीन नियमांमुळे महिलावर्गात प्रचंड संताप पाहायला मिळतोय.

6/11
पुणे: हॉटेल व्यावसायिकांवर चुलीवर जेवण बनवण्याची वेळपुण्यात कमर्शियल गॅसचा पुरवठा जवळपास बंद झाला आहे. याचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. हॉटेल्स बंद ठेवण्याची नामुष्की मालकांवर आली आहे. समोर गुढीपाडव्याचा सण असताना मिठाईच्या कारखान्यांमध्ये 10 ऐवजी केवळ 3 सिलिंडर मिळत असल्याने सणासुदीच्या ऑर्डर पूर्ण कशा करायच्या, असा प्रश्न उभा राहिला आहे.

7/11
छत्रपती संभाजीनगर: कामावर दांडी मारून गॅससाठी रांगेतसंभाजीनगरमधील एमआयडीसी वाळूज परिसरात नागरिक त्रस्त झाले आहेत. एका सिलिंडरसाठी लोकांना चक्क आपल्या नोकऱ्या सोडून रांगेत उभे राहावे लागत आहे. घरात गॅस नसल्याने अनेक कुटुंबांवर हॉटेलमधून जेवण मागवण्याची किंवा उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

8/11
अमरावती: गॅस एजन्सीसमोर ग्राहकांचा ठिय्याअमरावतीत मागणीच्या तुलनेत पुरवठा निम्म्याने घटला आहे. सिलिंडर वेळेवर घरी पोहोचत नसल्याने संतप्त ग्राहक थेट गोदामावर आणि एजन्सीवर धाव घेत आहेत. एजन्सी चालकांनाही संतप्त ग्राहकांच्या रोषाचा सामना करावा लागत असून पुरवठा कधी सुरळीत होईल, याची शाश्वती कोणाकडेही नाही.

9/11
कोल्हापूर: राजारामपुरीत पहाटेपासून राडाकोल्हापूरच्या राजारामपुरी भागात गॅस एजन्सीसमोर पहाटेपासूनच गोंधळ पाहायला मिळाला. तासनतास रांगेत उभं राहूनही गॅस मिळत नसल्याने आणि कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी बाचाबाची झाली.
कोल्हापूर: राजारामपुरीत पहाटेपासून राडाकोल्हापूरच्या राजारामपुरी भागात गॅस एजन्सीसमोर पहाटेपासूनच गोंधळ पाहायला मिळाला. तासनतास रांगेत उभं राहूनही गॅस मिळत नसल्याने आणि कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी बाचाबाची झाली. "घरची कामे सोडून आम्ही इथेच बसायचे का?" असा सवाल गृहिणी विचारत आहेत.
advertisement
10/11
ठाणे (कळवा): 45 हजार कुटुंबांना युद्धाचा फटकाठाण्यातील कळवा परिसरात एचपी गॅसचा मोठा तुटवडा जाणवत आहे. येथे दिवसाला 2000 सिलिंडरची मागणी असताना केवळ 900 सिलिंडर उपलब्ध होत आहेत. पुरवठा साखळीत खंड पडल्याने नागरिक थेट गॅस गोदामांवर जाऊन चौकशी करत आहेत, ज्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

11/11
आखाती देशांतील युद्ध लवकर थांबले नाही, तर महाराष्ट्रातील ही 'गॅस टंचाई' अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्या सरकार घरगुती सिलिंडरला प्राधान्य देत असले, तरी सामान्य माणसाला मात्र रणरणत्या उन्हात सिलिंडरसाठी 'वनवन' करावी लागत आहे.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement