Knowledge : शर्टच्या कॉलरखालील त्या छोट्या बटणाचं काम काय? 99 टक्के लोक देतील चुकीचं उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेकांना वाटते की ही केवळ एक 'स्टाईल' किंवा 'डिझाइन' आहे. जर तुम्हीही असाच विचार करत असाल, तर तुम्ही चुकताय. या इवल्याशा बटणांमागे एक अतिशय रंजक इतिहास आणि सुरक्षेचे मोठे कारण दडलेले आहे.
advertisement
अनेकांना वाटते की ही केवळ एक 'स्टाईल' किंवा 'डिझाइन' आहे. जर तुम्हीही असाच विचार करत असाल, तर तुम्ही चुकताय. या इवल्याशा बटणांमागे एक अतिशय रंजक इतिहास आणि सुरक्षेचे मोठे कारण दडलेले आहे. ज्याला आपण आज 'बटण-डाउन कॉलर' (Button-down Collar) म्हणतो, त्याचा शोध फॅशन रॅम्पवर नाही, तर खेळाच्या मैदानात लागला होता.
advertisement
खेळाच्या मैदानातून झाला उगमया बटणाचा इतिहास थेट 'पोलो' या खेळाशी जोडलेला आहे. जुन्या काळी, जेव्हा खेळाडू घोड्यावर बसून वेगाने पोलो खेळायचे, तेव्हा वेगामुळे आणि वाऱ्यामुळे त्यांच्या शर्टची कॉलर वारंवार उडून त्यांच्या तोंडावर किंवा डोळ्यांवर येत असे. यामुळे खेळाडूचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता असायची.
advertisement
advertisement
advertisement







