धोक्याची घंटा! 13 मार्चपासून 'या' 3 राशींच्या लोकांना राहावं लागणार सावध, आयुष्यात वाढणार अडचणी
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
13 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी एक मोठी गोष्ट घडणार आहे ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होईल, तसेच या काळात काही विशिष्ट राशींच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे.
advertisement
advertisement
तूळ - आर्थिक व्यवहारात सतर्कता: तूळ राशीमध्ये शनी उच्चाचा मानला जातो, परंतु अस्ताच्या काळात त्याचे शुभ फळ मिळण्यास विलंब होऊ शकतो. या काळात अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका किंवा जामीन राहू नका, कारण पैसे परत मिळण्यात अडचणी येऊ शकतात. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.
advertisement
मकर - करिअरमध्ये सावधगिरी: मकर राशीचा स्वामी शनी असून सध्या तो अस्ताला जात आहे. यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी काहीसा अडथळा किंवा विलंब जाणवू शकतो. वरिष्ठांशी वाद घालणे टाळा आणि तुमच्या कामातील गुणवत्तेवर लक्ष द्या. या काळात नवीन नोकरी बदलण्याचा घाईघाईने निर्णय घेऊ नका, परिस्थितीचा अंदाज घेऊनच पाऊल टाका.
advertisement
कुंभ - आरोग्याकडे दुर्लक्ष नको: कुंभ राशीवर सध्या साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू असून शनी या राशीचा स्वामी आहे. शनी अस्त झाल्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात काहीशी कमतरता जाणवू शकते. जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. मानसिक ताण टाळण्यासाठी योगासने किंवा ध्यान करणे फायदेशीर ठरेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









