तिघांनी रस्ता अडवला, ठाकरे गटाच्या उपतालुका प्रमुखांवर चाकू हल्ला, संभाजीनगर हादरलं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
कृष्णा राठोड यांचे कामगार चौकात ‘जय भवानी’ नावाचे हॉटेल आहे. रात्री हॉटेल बंद करून जात असताना कृष्णा राठोड यांच्यावर चाकू हल्ला झाला.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असलेले सहकारी मन्नू राठोड हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना मंगळवारी रात्री सुमारे 12 वाजेच्या सुमारास कामगार चौक परिसरात घडली. या हल्ल्यात दोघे जखमी झाले. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा राठोड यांचे कामगार चौकात ‘जय भवानी’ नावाचे हॉटेल आहे. रात्री हॉटेल बंद करून कृष्णा राठोड आणि त्यांचे सहकारी मन्नू राठोड हे चारचाकी वाहनाने घरी जात होते. कामगार चौकात पोहोचताच समोरून आलेल्या दुचाकीवरून तिघा अज्ञातांनी त्यांचा रस्ता अडवला.
advertisement
यानंतर दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. या झटापटीदरम्यान अज्ञात आरोपींनी कृष्णा राठोड यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी हस्तक्षेप पडलेल्या मन्नू राठोड यांच्यावरही आरोपींनी चाकूने वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघांनाही छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या दोघांवर उपचार सुरू आहे. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 3:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तिघांनी रस्ता अडवला, ठाकरे गटाच्या उपतालुका प्रमुखांवर चाकू हल्ला, संभाजीनगर हादरलं









