रियलमी नोट 80 फोन 9 हजार रुपयांत लॉन्च! मिळते 6300mAh बॅटरी, दमदार डिस्प्ले
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
रियलमी नोट 80 बचेट स्मार्टफोन म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन 6.74-इंच 90Hz डिस्प्ले, Unisoc T7250 प्रोसेसर आणि 6300mAh बॅटरीसह येतो. याची सुरुवातीची किंमत जवळपसा 9,000 रुपये आहे आणि यामध्ये अँड्रॉइड 15 वर बेस्ड रियलमी UI 6.0, 8MP कॅमेरा आणि 128GB पर्यंत स्टोरेज सारखे फीचर्स मिळतात...
चीनी स्मार्टफोन कंपनी रियलमीने आपला नवीन बजेट स्मार्टफोन रियलमी नोट 80 लॉन्च केला आहे. सध्या हा फोन निवडक मार्केट्समध्ये उपलब्ध आहे आणि इंडोनेशियामध्ये कंपनीची वेबसाइटच्या माध्यमातून खरेदी केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन्स आणि दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. यामध्ये मोठी 6300mAh बॅटरी, 90Hz डिस्प्ले आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
advertisement
advertisement
Realme Note 80 ची फीचर्स : Realme Note 80 मध्ये 6.74-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 720×1600 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 563 nits पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. स्क्रीन Panda MN228 प्रोटेक्शनसह देखील येते. परफॉर्मेंससाठी यामध्ये Unisoc T7250 ऑक्टा-कोर चिपसेट देण्यात आला आहे. जो माली-G57 GPUसह येतो. फोनमध्ये 4GB LPDDR4x RAM आणि 128GB पर्यंत eMMC 5.1 स्टोरेज मिळते. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित रियलमी UI 6.0 वर चालतो.
advertisement
advertisement
advertisement







