Nashik News: त्र्यंबकेश्वर मंदिरातील मारहाण प्रकरणी महत्त्वाची अपडेट, सुरक्षा रक्षकांची चौकशी होणार
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
गेल्या आठवड्यामध्ये त्र्यंबकेश्वरमधील महादेवाच्या मंदिरामध्ये सुरक्षारक्षकांनी एका भाविकाला केलेल्या मारहाण प्रकरणी आता चौकशी केली जाणार आहे.
नाशिक: गेल्या आठवड्यामध्ये त्र्यंबकेश्वरच्या महादेवाच्या मंदिरामध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी आता चौकशी केली जाणार आहे. भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या मारहाणीची चौकशी करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्यावेळी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमधील महादेवाच्या मंदिरामध्ये एका भाविकाला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. भाविकांना मारहाण केलेल्या सुरक्षा रक्षकांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केला होता. त्यानंतर आता त्यांनी मारहाण केलेल्या चौकशीची मागणी केलेली आहे.
रविवारी 1 मार्च रोजी सुरक्षा रक्षकाने त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात भाविकांना केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ह्या व्हायरल व्हिडिओवर आता शासनाकडून कारवाईचा बडगा उचलला आहे. शासनाने उपविभागीय दंडाधिकारी डॉ. जी. व्ही. एस. पवनदत्ता यांच्याकडून घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले आहे. शासनाने चौकशी अधिकाऱ्यांचीच थेट निवड केल्यामुळे चौकशीअंती काय समोर येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
भाविकांना मारहाण करण्याची घटना ही काही पहिली घडलेली नाही. यापूर्वी सुद्धा अनेकदा मंदिर प्रशासनाकडून भाविकांना मारहाण झालेली आहे. जिल्हा प्रशासनाने चौकशीसाठी चौकशी अधिकार्यांची निवड केल्यानंतर नागरिकांकडे या घटनेसंबंधित आणखी काही सबळ पुरावे आहेत का? किंवा आणखी काही इतर भाविकांच्या तक्रारी असतील तर पुढच्या तीन दिवसांमध्ये सादर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. ज्याला मारहाण करण्यात आली तो मुळचा हरियाणातील असून त्याचा शोध जिल्हा प्रशासनाला लागला नाही. या घटनेसंबंधित गुन्हा पोलीस शिपायांनी दाखल केला. त्यांनी सुरक्षारक्षकांसह इतर तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 3:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: त्र्यंबकेश्वर मंदिरातील मारहाण प्रकरणी महत्त्वाची अपडेट, सुरक्षा रक्षकांची चौकशी होणार







