advertisement

Pune Crime: पतीचं अफेअर, ‘त्या’ गोळ्यांनी गर्भपात, तर दीरानं..., विवाहितेच्या आरोपांनी खळबळ, पुण्यात भयंकर प्रकार

Last Updated:

Pune Crime: पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्याबद्दल विचारल्यास वारंवार अपमान आणि मारहाण करण्यात येत होता.

Pune Crime: पतीच अफेअर, ‘त्या’ गोळ्यांनी गर्भपात, तर दीरानं..., विवाहितेच्या आरोपांनी खळबळ, पुण्यात भयंकर प्रकार
Pune Crime: पतीच अफेअर, ‘त्या’ गोळ्यांनी गर्भपात, तर दीरानं..., विवाहितेच्या आरोपांनी खळबळ, पुण्यात भयंकर प्रकार
पुणे: पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील 33 वर्षीय विवाहितेने पती आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतर सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ करत पैशांसाठी दबाव, धमक्या दिल्या. तसेच पतीने दिलेल्या गोळ्यांमुळे गर्भपात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांत पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा विवाह 2019 मध्ये झाला होता. सुरुवातीला सर्वकाही सुरळीत होतं. परंतु, काही दिवसांनंतर पती आणि सासरच्या लोकांकडून छळ सुरू झाला. सतत टोमणे मारणे, शिवीगाळ करणे आणि अपमानास्पद वागणूक देण्याचे प्रकार सुरू झाले, असा आरोप विवाहितेने केला आहे.
advertisement
पतीच्या विवाहबाह्य संबंधांचा संशय
पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्याबद्दल विचारल्यास वारंवार अपमान आणि मारहाण करण्यात येत होता. तसेच सासू आणि दीराकडून देखील मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप विवाहितेने केला आहे. घरातील वातावरण तणावपूर्ण झाल्याने अनेकदा जीव देण्याचा विचार देखील मनात आल्याचं तिने पोलिसांना सांगितलं.
पैशांची मागणी
सासरच्या मंडळींवर तिने पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. माहेरून 15 लाख रुपये घेऊन येण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. लग्नामध्ये अपेक्षित मानपान न झाल्यामुळे टोमणे मारले जात होते. पैसे न आणल्यास जगणं मुश्किल करून टाकू, अशा धमक्या दिल्याचंही तिने सांगितलं.
advertisement
पतीने गोळ्या दिल्याने गर्भपात
डिसेंबर 2025 मध्ये तब्येत बिघडली होती. तेव्हा पतीने औषधांच्या नावाखाली काही गोळ्या दिल्या. त्या गोळ्या घेतल्यानंतर तीव्र पोटदुखी सुरू झाली आणि रक्तस्त्राव  सुरू झाला. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर गर्भपात झाल्याचे समजले. त्यामुळे हा गर्भपात पतीने दिलेल्या गोळ्यांनीच झाल्याचा संशय तिने व्यक्त केला.
दरम्यान, घरात कॅमेरे बसवून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तसेच दीरावर देखील गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी पती आणि सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Pune Crime: पतीचं अफेअर, ‘त्या’ गोळ्यांनी गर्भपात, तर दीरानं..., विवाहितेच्या आरोपांनी खळबळ, पुण्यात भयंकर प्रकार
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement