वैभव सूर्यवंशीला जे जमलं नाही ते त्याने करून दाखवलं, वर्ल्ड कपमध्ये ठोकलं सर्वात वेगवान शतक, कोण आहे खेळाडू?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
जे वैभव सुर्यवंशीला जमलं नाही ते एका खेळाडूने करून दाखवलं आहे. या खेळाडूने वर्ल्डकपमधलं सर्वांत वेगवान शतक ठोकलं आहे.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
Vaibhav Suryavanshi : टीम इंडियाचा ज्यूनिअर संघ सध्या अंडर 19 वर्ल्डकपमध्ये व्यस्त आहे. या वर्ल्डकपमध्ये कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशीकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. असे असतानाच जे वैभव सुर्यवंशीला जमलं नाही ते एका खेळाडूने करून दाखवलं आहे. या खेळाडूने वर्ल्डकपमधलं सर्वांत वेगवान शतक ठोकलं आहे.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर आज अंडर 19 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने जापानचा 8 विकेट राखून पराभव केला आहे.जापाने 201 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सलामीवीर विल मालाजकुर्कने 102 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळीत त्याने 5 षटकार आणि 12 चौकार लगावले होते. विल मालाजकुर्क बाद झाल्यानंतर नितेश सॅम्युअलने 60 धावांवर नाबाद राहून हा 29 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठलं होतं.त्यामुळे ऑस्ट्रेलियाने जापानचा 8 धावांनी पराभव केला आहे.
advertisement
जापानने प्रथम फलंदाजी करताना 201 धावा ठोकल्या होत्या. जापानकडून हुगो केलीने 79 धावांची खेळी केली होती. त्या व्यतिरीक्त कुणालाही मोठ्या धावा करता आल्या नाही त्यामुळे जापान 201 धावा करू शकली.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने इतिहास रचला
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल मालाजकुर्कने 55 बॉलमध्ये 102 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळीत त्याने त्याने 5 षटकार आणि 12 चौकार लगावले होते. वर्ल्डकप मधलं हे सर्वात वेगवान शतक आहे.त्यामुळे जे वैभव सूर्यवंशीकडून अपेक्षित होतं ते ऑस्ट्रेलियाच्या खेळाडून करून दाखवलं आहे, त्यामुळे खेळाडूची प्रचंड चर्चा रंगली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 11:39 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वैभव सूर्यवंशीला जे जमलं नाही ते त्याने करून दाखवलं, वर्ल्ड कपमध्ये ठोकलं सर्वात वेगवान शतक, कोण आहे खेळाडू?








