BBM 6 : छोट्या डॉनने आपल्या आयुष्यातील सांगितली अशी गोष्ट, गहिवरला राकेश, म्हणाला 'आपण मूर्ख कारणावरून...'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : राकेश छोटा डॉन म्हणजे प्रभूला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत विचारतो. तेव्हा प्रभू त्याला आपली लाइफ स्टोरी सांगतो, जी ऐकून राकेशचं मन गहिवरून येतं.
'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या चुरस वाढली आहे. प्रत्येक स्पर्धक स्वतःला सिद्ध करण्यासाठी जिवाचं रान करत आहे. पण सोबतच त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टीही लोकांसमोर येत आहेत. घरातील सर्वात चर्चेत असलेला जालन्याचा 'छोटा डॉन' प्रभु शेळकेने त्याची लाइफ स्टोरी बिग बॉसच्या घरात सांगितली आणि राकेश बापटचं मन गहिवरून आलं.
छोटा डॉन विनोदी रिल्स आणि हटके स्टाईलसाठी ओळखला जातो. त्यानं हालाखीच्या दिवसातून मार्ग काढत स्वत:चं एक अस्तित्व निर्माण केलं. त्याच्या आयुष्यातील एक अशी गोष्ट त्याने नुकतीच बिग बॉसच्या घरात सांगितली आहे.
बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहेत. ज्यात राकेश बापट आणि प्रभू शेळके एकत्र बसलेले दिसतात. राकेश प्रभूला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत विचारतो. घरी कोण कोण कमवतो. त्यावर प्रभू सांगतो, घरी तो एकटाच कमवतो, रोजचे 200 रुपये. त्याच्या वडिलांनी ड्रायव्हिंग करून केलेली कमाई त्याच्या उपचारासाठी घेतलेल्या पैशांचं कर्ज फेडण्यात जाते. त्यावर राकेश त्याला महिन्याला कर्जाचे किती पैसे जातात ते विचारतो. तेव्हा प्रभू त्याला 8-9 हजार रुपये अशी रक्कम सांगतो.
advertisement
यानंतर राकेश बापटला गहिवरून येतो. त्यांचं संभाषण सुरू असताना सोनाली राऊतही तिथं बसलेली दिसते. तिलाही हे ऐकून शॉक बसतो. प्रभू तिथून गेल्याचं दिसतं. त्यानंतर राकेश सोनालीला सांगतो, "महिन्याला 9 हजारसुद्धा खूप जास्त आहेत आणि आपण काय करतोय, आपण मूर्खासारखे कोणत्याही कारणावरून रडतो" प्रभूची लाइफ स्टोरी ऐकून त्यासमोर राकेशला आपली दुःख कमी वाटू लागतात.
advertisement
advertisement
छोट्या डॉनने पळवलं राकेश बापटच्या तोंडचं पाणी
याआधी बिग बॉसने दिलेल्या कॅप्टनसी टास्कमध्ये छोटा डॉन आणि राकेश आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी छोट्या डॉनने पळवलं राकेश बापटच्या तोंडचं पाणी पळवलं. सुरुवातीला राकेश वरचढ ठरेल असं वाटत होतं, पण प्रभूने आपल्या चपळाईने टास्कमध्ये अशी बाजी मारली की राकेश पूर्णपणे गोंधळून गेला. डॉनच्या या खेळीमुळे घरात एकच हशा पिकला. यानंतर नेटकऱ्यांनी छोट्या डॉनचं कौतुक केलं. 'बारक्याला हलक्यात नाही घ्यायचा नाय', अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या.
advertisement
गंभीर आजाराशी झुंज देतोय प्रभू
प्रभू शेळके हा जालना जिल्ह्यातील परतूर तालु्क्यातील वलखेड गावचा रहिवासी. अत्यंत गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याला खरी ओळख सोशल मीडियातून मिळाली. पण सगळ्यांचं मनोरंजन करणारा हा छोटा डॉन गंभीर आजाराशी झुंज देत आहे. त्याला थॅलेसेमिया हा गंभीर आजार आहे. त्याच्या उपचारासाठी त्याच्या आईवडिलांनी वावरही विकलं. पण आपल्या या आजाराचं कुठलंही भांडवल न करता, त्यानं चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळवलं. त्यानं आपल्या संघर्षाची कहाणी याआधीही बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना सांगितली. यावेळी बिग बॉसचा होस्ट रितेश देशमुखसह सगळे स्पर्धक भावुक झाले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 9:30 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM 6 : छोट्या डॉनने आपल्या आयुष्यातील सांगितली अशी गोष्ट, गहिवरला राकेश, म्हणाला 'आपण मूर्ख कारणावरून...'







