Weather Alert: कल्याण-डोंबिवली तापमानात मोठे बदल, आता नवसंकट येणार, हवामान खात्याकडून अलर्ट
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि सकाळी उशिरापर्यंत हलके धुके अनुभवायला मिळेल. यावरून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी कल्याण डोंबिवली शहरातील हवामान स्थिती काय असेल बघुयात.
महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून चढउतार बघायला मिळत आहेत.उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील किमान तापमानात घट होऊन थंडी जोर वाढेल. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि सकाळी उशिरापर्यंत हलके धुके अनुभवायला मिळेल. यावरून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी कल्याण डोंबिवली शहरातील हवामान स्थिती काय असेल बघुयात.
advertisement
कल्याण तालुक्यात थंडी ओसरल्याने रविवारी हवेत दमटपणा होता. आज मात्र वातावरण पुन्हा बदलून स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस असेल,दुपारी उबदारपणा जाणवेल,हवामानातील बदलांमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement









