आता करा आरामदायी प्रवास, पुणे ते बोरीवली धावणार ई-शिवाई, पाहा वेळापत्रक
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे स्टेशनपासून बोरीवली (सायन मार्गे) पर्यंत ई-शिवाई वातानुकूलित बस सेवा आता सुरू करण्यात आली आहे.
पुणे: नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे स्टेशनपासून बोरीवली (सायन मार्गे) पर्यंत ई-शिवाई वातानुकूलित बस सेवा आता सुरू झाली आहे. ही सेवा प्रवाशांसाठी अधिक आरामदायी आणि सोयीस्कर ठरणार आहे.
MSRTCच्या नव्या या बस सेवेची सुरुवात शिवाजीनगर आगारातून करण्यात आली आहे. या मार्गात बस पुणे स्टेशन, चिंचवड आणि सायन मार्गे बोरीवलीपर्यंत प्रवास करेल. प्रवाशांना शहरातील गर्दी टाळून आणि आरामात प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
सकाळी 6, 7, 8 आणि 9 वाजता तसेच दुपारी 1, 2, 3 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता या बसच्या फेऱ्या आहेत. MSRTCने सांगितले की, या सेवेचा उद्देश प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि वातानुकूलित प्रवास देणे आहे. विशेषतः पुणे-चिंचवड-बोरीवली मार्गावर रोज अनेक प्रवासी कामासाठी प्रवास करतात, त्यामुळे ही सेवा त्यांच्यासाठी खूप सोयीची ठरणार आहे.
advertisement
प्रवाशांना सोयीस्करपणे बस तिकीट आधीच आरक्षित करता यावे यासाठी पुणे स्टेशन बसस्थानक, वल्लभनगर, चिंचवड स्टेशन आणि निगडी येथे तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच प्रवासी MSRTC मोबाईल ॲप किंवा https://npublic.msrtcors.com/ या संकेतस्थळावरूनही तिकीट ऑनलाइन आरक्षित करू शकतात. ई-शिवाई वातानुकूलित बस सेवा सुरक्षित, आरामदायी आणि वेळ वाचवणारी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 9:25 AM IST










