advertisement

Baby Planning : फॅमिली प्लॅनिंगसाठी सर्वोत्तम वेळ कोणती? गोंधळून न जाता 'या' 5 गोष्टीं चेक करा, मगच घ्या मोठा निर्णय

Last Updated:
What is Right Time To Have Baby : तज्ज्ञांच्या मते, फॅमिली प्लॅनिंगसाठी कोणतीही एक 'युनिव्हर्सल' तारीख नसते, पण खालील 5 निकष तुमची ही वेळ ठरवू शकतात.
1/10
 "लग्नाला दोन वर्ष झाली, आता वयोमानानुसार विचार करा..." "करिअर तर आयुष्यभर चालत राहील, पण मुलांसाठी योग्य वेळ निघून जाईल..." असे सल्ले आपल्याला रोज ऐकायला मिळतात. पण मुलाला जन्माला देणं म्हणजे केवळ नऊ महिने आणि बाळंतपण नसतं, तर ती पुढच्या 20-25 वर्षांची गुंतवणूक असते. नवीन जीवाला जगात आणण्याची तयारी असते आणि त्याचं भविष्य सुरक्षित करणं देखील आई-वडिंलासाठी मोठी जबाबदारी असते. म्हणूनच, घाईघाईत निर्णय घेण्यापेक्षा 'परफेक्ट वेळ' नेमकी कोणती, हे समजून घेणं गरजेचं आहे.

2/10
तज्ज्ञांच्या मते, फॅमिली प्लॅनिंगसाठी कोणतीही एक 'युनिव्हर्सल' तारीख नसते, पण खालील 5 निकष तुमची ही वेळ ठरवू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, फॅमिली प्लॅनिंगसाठी कोणतीही एक 'युनिव्हर्सल' तारीख नसते, पण खालील 5 निकष तुमची ही वेळ ठरवू शकतात.
advertisement
3/10
1. वयाचं गणित आणि शारीरिक आरोग्य (Biological Age)विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर महिलांसाठी वयाची 20 ते 30 वर्षे ही फर्टिलिटीसाठी (प्रजनन क्षमता) सर्वात उत्तम मानली जातात. तज्ज्ञांच्या मते, 35 नंतर महिलांमध्ये 'एग क्वालिटी' आणि प्रमाण कमी होऊ लागतं, ज्यामुळे गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात.
एक्सपर्ट ओपिनियन: तुमचं वय जर 30 च्या आसपास असेल, तर डॉक्टरांकडून एकदा 'प्री-कन्सेप्शन चेकअप' करून घेणं सोयीचं ठरतं. पुरुषांच्या बाबतीतही वयानुसार शुक्राणूंची गुणवत्ता बदलत असते, त्यामुळे दोघांचं शारीरिक आरोग्य हा सर्वात महत्त्वाचा पाया आहे.
1. वयाचं गणित आणि शारीरिक आरोग्य (Biological Age)विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर महिलांसाठी वयाची 20 ते 30 वर्षे ही फर्टिलिटीसाठी (प्रजनन क्षमता) सर्वात उत्तम मानली जातात. तज्ज्ञांच्या मते, 35 नंतर महिलांमध्ये 'एग क्वालिटी' आणि प्रमाण कमी होऊ लागतं, ज्यामुळे गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात.एक्सपर्ट ओपिनियन: तुमचं वय जर 30 च्या आसपास असेल, तर डॉक्टरांकडून एकदा 'प्री-कन्सेप्शन चेकअप' करून घेणं सोयीचं ठरतं. पुरुषांच्या बाबतीतही वयानुसार शुक्राणूंची गुणवत्ता बदलत असते, त्यामुळे दोघांचं शारीरिक आरोग्य हा सर्वात महत्त्वाचा पाया आहे.
advertisement
4/10
2. मानसिक तयारी (Emotional Readiness)बाळ आल्यावर तुमचं आयुष्य 180 अंशात बदलणार असतं. रात्रीची झोप पूर्ण न होणं, स्वतःसाठी वेळ न मिळणं आणि पूर्णपणे एका जिवावर लक्ष केंद्रित करणं, यासाठी तुम्ही आणि तुमचे जोडीदार मानसिकरित्या तयार आहात का?
महत्त्वाची टीप: जर तुम्ही सध्या नोकरीच्या किंवा वैयक्तिक तणावात असाल, तर अशा वेळी फॅमिली प्लॅनिंग करणं नात्यावर ताण आणू शकतं. बाळ हे नात्यातील दुरावा कमी करण्यासाठीचं 'साधन' नसून, ते सुखी नात्याचं 'फळ' असावं.
2. मानसिक तयारी (Emotional Readiness)बाळ आल्यावर तुमचं आयुष्य 180 अंशात बदलणार असतं. रात्रीची झोप पूर्ण न होणं, स्वतःसाठी वेळ न मिळणं आणि पूर्णपणे एका जिवावर लक्ष केंद्रित करणं, यासाठी तुम्ही आणि तुमचे जोडीदार मानसिकरित्या तयार आहात का?महत्त्वाची टीप: जर तुम्ही सध्या नोकरीच्या किंवा वैयक्तिक तणावात असाल, तर अशा वेळी फॅमिली प्लॅनिंग करणं नात्यावर ताण आणू शकतं. बाळ हे नात्यातील दुरावा कमी करण्यासाठीचं 'साधन' नसून, ते सुखी नात्याचं 'फळ' असावं.
advertisement
5/10
3. आर्थिक स्थिरता (Financial Stability)हे ऐकायला थोडं व्यावहारिक वाटेल, पण आजच्या काळात मुलांचं संगोपन, लसीकरण आणि शिक्षण खूप महागलं आहे.
प्लॅनिंग करताना: बाळंतपणाचा खर्च, त्यानंतरची 3-4 वर्षे आईला जर सुट्टी घ्यावी लागली तर घर कसं चालेल, आणि मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही काही बचत केली आहे का? या प्रश्नांची उत्तरं जर सकारात्मक असतील, तर ती तुमच्यासाठी 'योग्य वेळ' असू शकते.
3. आर्थिक स्थिरता (Financial Stability)हे ऐकायला थोडं व्यावहारिक वाटेल, पण आजच्या काळात मुलांचं संगोपन, लसीकरण आणि शिक्षण खूप महागलं आहे.प्लॅनिंग करताना: बाळंतपणाचा खर्च, त्यानंतरची 3-4 वर्षे आईला जर सुट्टी घ्यावी लागली तर घर कसं चालेल, आणि मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही काही बचत केली आहे का? या प्रश्नांची उत्तरं जर सकारात्मक असतील, तर ती तुमच्यासाठी 'योग्य वेळ' असू शकते.
advertisement
6/10
4. करिअर आणि सपोर्ट सिस्टीमअनेक महिलांना करिअरच्या शिखरावर असताना ब्रेक घेण्याची भीती वाटते. अशा वेळी तुमच्या ऑफिसमधील मॅटर्निटी पॉलिसी काय आहेत, हे तपासून पहा. तसेच, बाळ झाल्यावर तुमच्या मदतीला घरी आई-वडील, सासू-सासरे किंवा एखादी विश्वासार्ह 'सपोर्ट सिस्टीम' आहे का? जर तुम्ही दोघेच (Nucleur Family) राहत असाल, तर बाळाची जबाबदारी कशी वाटून घेणार, यावर आधीच चर्चा करा.

7/10
5. नातेसंबंधातील परिपक्वताबाळ होण्याआधी जोडीदारासोबत पुरेसा वेळ घालवणं खूप गरजेचं असतं. एकमेकांचे स्वभाव, आवडीनिवडी आणि एकमेकांना समजून घेण्याची क्षमता जर चांगली असेल, तर बाळ आल्यानंतर येणारे ताणतणाव तुम्ही मिळून सोडू शकता. ज्या नात्यात आधीच खूप वाद आहेत, तिथे बाळ झाल्यामुळे जबाबदाऱ्या वाढून वाद अधिक विकोपाला जाऊ शकतात.

8/10
तज्ज्ञांचा 'गोल्डन' सल्ला:आजच्या धावपळीच्या युगात जर तुम्हाला वाटत असेल की करिअरमुळे तुम्हाला आता बाळ नकोय, पण भविष्यात प्रॉब्लेम येईल; तर 'एग फ्रीजिंग' (Egg Freezing) सारखे पर्याय आता उपलब्ध आहेत. पण नैसर्गिकरित्या विचार केल्यास, तिशीच्या आत किंवा तिशीच्या सुरुवातीला फॅमिली प्लॅनिंग करणं हे आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी अधिक सुरक्षित मानलं जातं.

9/10
लोकांचं ऐकून किंवा सोशल मीडियावर इतरांचे 'बेबी फोटोज' बघून फॅमिली प्लॅनिंग करू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात, तीच तुमच्यासाठी 'सर्वोत्तम वेळ' असेल.

10/10
(नोट : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
(नोट : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement