पुण्यात सायको किलर? एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांड, दरीत मृतदेह,पण त्या एका डायरीमुळे 5 खुनांचा खुलासा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
दोन दिवसांत दोन खून करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सुपा पोलिसांनी अटक केली असून, त्याने यापूर्वीही तीन खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून झालेल्या एका थरारक दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. दोन दिवसांत दोन खून करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सुपा पोलिसांनी अटक केली असून, त्याने यापूर्वीही तीन खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जैतू चिंधू बोरकर (४३, रा. खेड) असे या विकृत आरोपीचे नाव आहे.
प्रेमाला नकार अन् सूड: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जैतू बोरकर याचे रंजना वाघमारे (२५) हिच्यावर एकतर्फी प्रेम होते. मात्र, रंजनाने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला होता. या रागातून जैतूने १७ जानेवारी रोजी रंजनाचा साथीदार सूरज वाघ (३०) याचा कोयत्याने वार करून खून केला आणि त्याचा मृतदेह खेडमधील एका दरीत फेकून दिला.
advertisement
दुसरा खून आणि पोलिसांचा तपास: सूरजचा काटा काढल्यानंतर आरोपीने रंजनाला जबरदस्तीने सुपा (ता. बारामती) परिसरात आणलं. तिथे तिने पुन्हा विरोधात जाऊन पोलिसांकडे जाण्याची धमकी दिली. पकडले जाण्याच्या भीतीने जैतूने १८ जानेवारी रोजी रंजनाच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली. १९ जानेवारीला रंजनाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत काळखैरेवाडी येथे सापडला होता.
advertisement
डायरी आणि सीसीटीव्ही ठरले गेमचेंजर: पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करताना पोलिसांना घटनास्थळी एक छोटी डायरी सापडली. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीची संशयास्पद हालचाल दिसून आली. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी जैतूला खेड परिसरातून बेड्या ठोकल्या.
पाच खुनांचा रेकॉर्ड: तपासात असे निष्पन्न झाले की, जैतू हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीच खुनाचे तीन गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये एका दुहेरी हत्याकांडाचा समावेश आहे. ताज्या दोन हत्यांनंतर त्याच्या नावावर आता पाच खुनांची नोंद झाली आहे. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे पुढील तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 8:21 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात सायको किलर? एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांड, दरीत मृतदेह,पण त्या एका डायरीमुळे 5 खुनांचा खुलासा










