advertisement

बँकेच्या कामासाठी बाहेर पडताय? थांबा! आज बँक सुरू राहणार की बंद एकदा पाहा

Last Updated:

देशव्यापी संपामुळे सलग चौथ्या दिवशी बँका बंद आहेत. पगारवाढ, पाच दिवसांचा आठवडा आणि पेन्शनसाठी कर्मचारी संघटनांचा संप सुरू आहे. नेट बँकिंग सुरू आहे.

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम bankofmaharashtra.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तेथे नवीन रजिस्ट्रेशन करा आणि नंतर लॉग इन करा. त्यानंतर अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरा. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि सही अपलोड करा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी त्याचा प्रिंटआउट काढून ठेवणे विसरू नका.
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम bankofmaharashtra.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तेथे नवीन रजिस्ट्रेशन करा आणि नंतर लॉग इन करा. त्यानंतर अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरा. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि सही अपलोड करा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी त्याचा प्रिंटआउट काढून ठेवणे विसरू नका.
तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर तुम्ही आज बँकेत कामासाठी जात असाल तर थांबा, तुम्हाला आज पुन्हा बँकेला टाळं लागलेलं दिसू शकतं. याचं कारण म्हणजे आज सलग चौथ्या दिवशी देखील बँक बंद राहणार आहे. त्यामुळे तुम्ही बँकेत जायचा प्लॅन करत साल तर तुमचा आजचा दिवस फुकट जाऊ शकतो.
दुसरा शनिवार सुट्टी, रविवार आणि त्यानंतर आलेली सार्वजनिक सुट्टी अशा सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर आज बँकांचे कामकाज पूर्वपदावर येईल, अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र, आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आज 'देशव्यापी संप' पुकारला आहे. त्यामुळे आज कामकाजाचा दिवस असूनही बँकांचे दरवाजे उघडणार नाहीत.
बँका का बंद आहेत?
पगारवाढ, पाच दिवसांचा कामाचा आठवडा आणि पेन्शनशी संबंधित काही जुन्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बँक कर्मचारी संघटनांनी या संपाचे हत्यार उपसले आहे. प्रशासनासोबत झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्याने कर्मचाऱ्यांनी आज कामावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सलग चौथ्या दिवशी बँका बंद राहणार असून, चेक क्लिअरन्स आणि रोख व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे.
advertisement
शाखांमधील कामकाज ठप्प:
जर तुम्हाला बँकेत जाऊन रोख रक्कम जमा करायची, नवीन चेकबुक घ्यायचे, केवायसी (KYC) अपडेट करायचे असेल, तर उद्या या कामांसाठी मोठी अडचण येऊ शकते.
चेक क्लिअरन्समध्ये विलंब:
चेक क्लिअर करण्याची प्रक्रिया प्रामुख्याने सरकारी बँकांमार्फतच होते. संपामुळे चेक क्लिअर होण्यास 2 ते 3 दिवसांचा उशीर होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे पेमेंट अडकण्याची शक्यता आहे.
advertisement
ATM मध्ये रोख टंचाई:
सलग तीन दिवस बँका बंद राहिल्यामुळे एटीएममध्ये रोख रक्कम संपण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः लहान शहरे आणि निवासी भागांतील एटीएम उद्या रिकामे मिळण्याची शक्यता आहे.
कर्ज व सरकारी कामांवर परिणाम:
जर तुमचे कर्ज मंजुरी, बँक एनओसी (NOC) किंवा इतर सरकारी कामे प्रलंबित असतील, तर ती आता बुधवार किंवा गुरुवारपर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
advertisement
तुमची कामं कशी होणार?
नेट बँकिंग किंवा बँकांच्या अधिकृत मोबाईल अॅपद्वारे तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. गुगल पे, फोन पे सारख्या सेवा सुरळीत सुरू राहतील. सलग सुट्ट्यांमुळे काही ठिकाणी ATM बंद राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जास्तीच्या गर्दीमुळे काही ठिकाणी पैसे संपण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
ग्राहकांनो, हे लक्षात घ्या!
ज्या कामांसाठी प्रत्यक्ष बँकेत जाणे अनिवार्य आहे (उदा. नवीन खातं उघडणं, पासबुक प्रिंटिंग, मोठी रोख रक्कम काढणे किंवा सोन्याचे दागिने गहाण ठेवणे), ती कामं आज पूर्ण होऊ शकणार नाहीत. त्यामुळे तुमचा मौल्यवान वेळ आणि हेलपाटा वाचवण्यासाठी आज बँकेत जाणे टाळावे. त्यामुळे आज बँकेत न जाणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. हा संप आज असला तरीसुद्धा तो उद्याही सुरू राहणार आहे का याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
view comments
मराठी बातम्या/मनी/
बँकेच्या कामासाठी बाहेर पडताय? थांबा! आज बँक सुरू राहणार की बंद एकदा पाहा
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement