advertisement

बँक ॲप्लिकेशनचा पासवर्ड बदलताना सावधान; एक नोटिफीकेशन अन् पुण्यातील तरुणाने गमावले लाखो रूपये

Last Updated:

श्रीराम रावसाहेब गीते (३२) हे आपल्या मोबाईलवर बँक ऑफ महाराष्ट्रचे 'महा मोबाईल प्लस' ॲप वापरत होते. ७ डिसेंबर २०२५ रोजी ॲप वापरत असताना त्यांना नवीन पासवर्ड टाकण्यासाठी नोटिफीकेशन आलं.

तरुणाला लाखोंचा गंडा (AI Image)
तरुणाला लाखोंचा गंडा (AI Image)
पुणे : देहूगाव परिसरात फसवणुकीची एक धक्कादायक आणि अजब घटना समोर आली आहे. यात बँक ॲप्लिकेशनचा पासवर्ड अपडेट करणे एका तरुणाला भलतेच महागात पडले. पासवर्ड अपडेट करताना सायबर चोरट्यांनी त्याच्या खात्यातून तब्बल ६ लाख ९ हजार रुपये लंपास केले आहेत. पासवर्ड बदलण्याच्या एका चुकीच्या क्लिकमुळे हा तरुण आर्थिक संकटात सापडला आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी श्रीराम रावसाहेब गीते (३२) हे आपल्या मोबाईलवर बँक ऑफ महाराष्ट्रचे 'महा मोबाईल प्लस' ॲप वापरत होते. ७ डिसेंबर २०२५ रोजी ॲप वापरत असताना त्यांना नवीन पासवर्ड टाकण्यासाठी नोटिफीकेशन आलं. सायबर चोरट्यांनी रचलेल्या जाळ्यात अडकून त्यांनी नवीन पासवर्ड टाकताच, ते ॲपमधून अचानक बाहेर पडले.
ॲपमधून बाहेर पडताच श्रीराम यांच्या मोबाईलवर वेगवेगळ्या कंपन्यांचे मेसेज येऊ लागले. त्यांनी बँक खाते तपासले असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून ४ लाख ८५ हजार, ५० हजार आणि ३९ हजार रुपये अशा वेगवेगळ्या रकमा इतर खात्यांवर वर्ग केल्या होत्या. इतकेच नाही, तर एटीएम स्वॅपद्वारे ३५ हजार रुपये देखील काढले गेले होते.
advertisement
याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात अज्ञात खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅनरा बँक आणि एनएसडीएल पेमेंट बँकेच्या विविध संशयास्पद खात्यांवर ही रक्कम वर्ग झाली आहे. सध्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत असून, 'बँक पासवर्ड' किंवा 'ॲप अपडेट'च्या नावाखाली येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
बँक ॲप्लिकेशनचा पासवर्ड बदलताना सावधान; एक नोटिफीकेशन अन् पुण्यातील तरुणाने गमावले लाखो रूपये
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement