१७ फेब्रुवारीला वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण! या ४ राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, काय काळजी घ्याल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : 2026 या नव्या वर्षाचा पहिला महिना आता शेवटच्या टप्प्यात आला असून, लवकरच फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होणार आहे.
मुंबई : 2026 या नव्या वर्षाचा पहिला महिना आता शेवटच्या टप्प्यात आला असून, लवकरच फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होणार आहे. नव्या महिन्यासोबतच खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून एक महत्त्वाची घटना घडणार आहे. पंचांगानुसार, 2026 सालातील पहिले सूर्यग्रहण फेब्रुवारी महिन्यात होणार असून, या ग्रहणाचा प्रभाव अनेक राशींच्या आयुष्यावर जाणवू शकतो. ग्रहणाच्या काळात कोणत्या राशींना विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कोणत्या नक्षत्रांवर त्याचा अधिक परिणाम होईल, तसेच या काळात काय करावे आणि काय टाळावे, याबाबत जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
फेब्रुवारीत कधी लागणार सूर्यग्रहण?
पंचांगानुसार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. हे ग्रहण कंकणाकृती (Annular Solar Eclipse) स्वरूपाचे असेल. खगोलशास्त्रानुसार, हे सूर्यग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिका, आफ्रिकेतील काही भाग आणि दक्षिण अटलांटिक महासागराच्या परिसरात दिसणार आहे. भारतातून हे ग्रहण दृश्यमान नसल्यामुळे, सुतक काळ भारतात लागू होणार नाही. हे ग्रहण दुपारी सुमारे 3 वाजून 26 मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री 8 वाजेपर्यंत चालेल.
advertisement
कोणत्या राशी आणि नक्षत्रांवर होणार अधिक परिणाम?
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, हे सूर्यग्रहण कुंभ राशीत आणि शतभिषा नक्षत्रात होणार आहे. त्यामुळे कुंभ राशीतील तसेच शतभिषा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींवर या ग्रहणाचा प्रभाव अधिक प्रमाणात जाणवू शकतो. या काळात आरोग्याशी संबंधित तक्रारी, मानसिक अस्वस्थता तसेच आर्थिक निर्णयांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे करार, गुंतवणूक किंवा मोठे निर्णय घेताना विशेष दक्षता बाळगण्याचा सल्ला ज्योतिषी देत आहेत. कोणावरही सहज विश्वास ठेवणे या काळात नुकसानकारक ठरू शकते.
advertisement
या राशींनी राहावे सावध
सिंह (Leo) – वैवाहिक आयुष्यात गैरसमज वाढू शकतात. भागीदारीत केलेल्या व्यवसायात अडथळे येण्याची शक्यता आहे. संवादात संयम ठेवणे गरजेचे ठरेल.
वृश्चिक (Scorpio) – घरातील वातावरण तणावपूर्ण राहू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची अचानक काळजी घ्यावी लागू शकते.
कुंभ (Aquarius) – मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. चालू असलेली कामे रखडू शकतात. निर्णय घेताना घाई टाळावी.
advertisement
मकर (Capricorn) – आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक किंवा मोठ्या व्यवहारांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.
सूर्यग्रहण काळात काय करावे आणि काय टाळावे?
धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या काळात सूर्यदेवाला अर्पण केलेले मंत्र, गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून दानधर्म करावा, असेही सांगितले जाते. गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. धारदार वस्तू वापरणे टाळावे, अशी पारंपरिक श्रद्धा आहे. तसेच, ग्रहणाच्या वेळी नकारात्मक विचार टाळून शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 6:43 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
१७ फेब्रुवारीला वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण! या ४ राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, काय काळजी घ्याल?








