advertisement

Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं

Last Updated:

Dharashiv ZP Election : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला नाही. आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

Rapid Read
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
धाराशिव: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला नाही. आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे. धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना त्यांचेच पुतणे धनंजय सावंत यांनी थेट आव्हान दिले असून, त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे.

बालेकिल्ल्यातच सावंतांची कोंडी?

तानाजी सावंत यांचा परंडा हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, घरातीलच व्यक्तीने बंडखोरी कायम ठेवल्याने सावंतांसमोर मोठे राजकीय संकट उभे राहिले आहे. धनंजय सावंत यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीमधील स्थानिक वाद आता टोकाचे झाले आहेत. विशेष म्हणजे, स्वतः धनंजय सावंत हे निजाम जवळा गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असल्याने त्यांनी काकाला थेट मैदानातून आव्हान दिले आहे.
advertisement

जागावाटपाचे सूत्र ठरले

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय सावंत यांचा गट आणि भाजप यांच्यात जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले आहे. अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली, जागांचे वाटप झाल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषेदत २ आणि पंचायत समितीमध्ये ४ जागा या धनंजय सावंत यांना देण्यात आल्या आहेत.
स्वतः धनंजय सावंत हे निजाम जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
दरम्यान, राज्यात आणि जिल्ह्यात शिवसेना-भाजप युती एकत्र असताना, परंडा मतदारसंघात मात्र चित्र वेगळे दिसत आहे. तानाजी सावंत यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने सावंतांच्याच पुतण्याला सोबत घेऊन मोठा डाव खेळला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement