Mumbai : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, आता लोकलच्या गर्दीत अपघात नाही होणार,सेवेते दाखल होतायेत खास डबे
Last Updated:
Mumbai Non AcAutomatic Door Local : लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता लवकरच नव्या स्वयंचलित दरवाजांची लोकलमधून प्रवास करता येणार आहे. नक्की ही लोकल कधीपासून धावणार आहे ते जाणून घ्या.
मुंबई : मुंबईकरांचा प्रवास हा लोकल ट्रेन शिवाय अपूरा आहे. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे रुळावर नॉन-एसी लोकल येणार असल्याची चर्चा सुरु होती पण नेमका प्रवास यातून कधी करता येणार हे ठरले नव्हते. मात्र आता बंद दरवाज्यांची लोकल धावण्याची तारीख ठरलेली आहे.
बंद दरवाजांच्या लोकलची प्रतीक्षा संपली
नव्या नॉन-एसी लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. प्रत्येक डब्याच्या दरवाज्यांवर तसेच आतील भागात मजबूत जाळी बसवण्यात येणार आहे. यामुळे प्रवासादरम्यान अपघात होण्याचा धोका कमी होणार आहे. तसेच डब्याच्या छताजवळ अत्याधुनिक फोर्स्ड व्हेंटिलेशन ही सिस्टिम बसवली जाणार आहे.
फेब्रुवारीअखेर मुंबईच्या ताफ्यात नवी लाईफलाईन
स्वयंचलित दरवाजे असलेली नॉन-एसी लोकल फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईत दाखल होणार आहे. या लोकलचे डिझाइन चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्ट्री येथे फिक्स करण्यात आले आहे. तयार झाल्यानंतर ही लोकल मध्य आणि पश्चिम रेल्वेला वापरासाठी देण्यात येणार आहे. यासोबतच 15 डब्यांच्या तीन लोकलही रेल्वेला मिळणार आहेत.
advertisement
गर्दीतही मिळेल मोकळी हवा
या व्हेंटिलेशन प्रणालीमुळे डब्यातील हवा नीट राहील. कार्बन डायऑक्साइड बाहेर जाईल आणि ऑक्सिजनची पातळी योग्य राखली जाईल असे ICF अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे गर्दी असतानाही प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 8:44 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, आता लोकलच्या गर्दीत अपघात नाही होणार,सेवेते दाखल होतायेत खास डबे









