राज्य कृषी विभागाचा मोठा निर्णय! १३ जैव उत्तेजकांवर घातली बंदी, नावांची यादी जाहीर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांबाबत (बायो-स्टिम्युलंट्स) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांबाबत (बायो-स्टिम्युलंट्स) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी आयुक्तालयाने जैव उत्तेजकांच्या १३ उत्पादनांवर राज्यभर बंदी घातली असून, हा निर्णय केंद्र शासनाच्या आदेशानंतर अंमलात आणण्यात आला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या निर्णयामुळे निविष्ठा कंपन्यांसह शेतकरी वर्गातही चर्चेला उधाण आलं आहे.
निर्णय काय?
केंद्र शासनाने ‘खत नियंत्रण कायदा १९८५’ अंतर्गत २३ फेब्रुवारी २०२१ पासून सहाव्या परिशिष्टात जैव उत्तेजकांचा समावेश केला. त्यानंतर कोणती उत्पादने जैव उत्तेजक म्हणून मान्य असतील, त्यांच्या निर्मिती, विक्री आणि वापराबाबत केंद्र सरकारकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना आणि निर्णय जाहीर करण्यात आले. या प्रक्रियेनंतर एकूण ११ श्रेणींमध्ये १५९ जैव उत्तेजक उत्पादनांच्या निर्मितीसाठी निविष्ठा कंपन्यांना परवानगी देण्यात आली होती.
advertisement
मात्र, या यादीतील काही उत्पादने प्राणिजन्य घटकांपासून (अॅनिमल सोर्स) तयार केली जात असल्याचा आरोप करत काही राज्यांतील बिगर कृषी संस्थांनी केंद्र शासनाकडे तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींमुळे जैव उत्तेजकांच्या वापरासंदर्भात वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली. वाद अधिक चिघळू नये, यासाठी केंद्र शासनाने सविस्तर अभ्यास न करता थेट खत नियंत्रण आदेशात सुधारणा केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या सुधारित आदेशानुसार संबंधित १३ उत्पादने जैव उत्तेजकांच्या अधिकृत यादीतून वगळण्यात आली.
advertisement
कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले की, जैव उत्तेजकांच्या उत्पादन, विक्री आणि मान्यतेचा विषय पूर्णतः केंद्र शासनाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे केंद्राच्या निर्णयानंतर राज्याकडे या १३ उत्पादनांवर बंदी घालण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. त्यानुसार राज्यात या उत्पादनांची निर्मिती, विक्री आणि साठवणुकीस प्रतिबंध करणारा आदेश जारी करण्यात आला आहे. याशिवाय या उत्पादनांची आयातदेखील रोखण्यात आली आहे.
advertisement
बंदी घालण्यात आलेली उत्पादने आढळून आल्यास संबंधित निविष्ठा कंपन्यांविरोधात फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील गुणनियंत्रण कक्षामार्फत कृषी अधिकाऱ्यांना या उत्पादनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाजारात, कृषी सेवा केंद्रांवर किंवा शेतकऱ्यांकडे ही उत्पादने आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे.
advertisement
दरम्यान, बंदी घातलेली ही १३ जैव उत्तेजक उत्पादने कृषी आयुक्तालयाने परवाना वितरण प्रणालीतूनही हटवली आहेत. त्यामुळे सध्या राज्यात केवळ १४६ जैव उत्तेजक उत्पादनांसाठीच वैध परवाने अस्तित्वात आहेत. कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग) अशोक किरनळ्ळी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “बंदी घातलेल्या उत्पादनांची निर्मिती, विक्री किंवा आयात टाळावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
advertisement
बंदी घातलेली जैव उत्तेजके कोणते?
मिश्रणयुक्त निर्मिती (मिक्स्ड फॉर्म्यूलेशन)असलेली जैव उत्तेजके
१) मिक्श्चर ऑफ प्रोटिन हायड्रोलायसेट्स व सागरी अर्क (सीवीड एक्सट्रॅक्ट) (लिक्विड)
२) मिक्श्चर ऑफ प्रोटिन हायड्रोलायसेट्स अॅण्ड अंटीऑक्सिडंटस एक्सट्रॅक्ट (लिक्विड)
३) मिक्श्चर ऑफ प्रोटिन हायड्रोलायसेट्स, सीवीड एक्सट्रॅक्ट अॅण्ड ह्युमिक अॅसिड (लिक्विड)
प्रोटिन हायड्रोलायसेट्स अॅण्ड अमायनो अॅसिड्स (लिक्विड)
प्रोटिन हायड्रोलायसेट्स ६२.१ टक्के (अॅनिमल सोर्स) (लिक्विड)
advertisement
प्रोटिन हायड्रोलायसेट्स ३६.०४ टक्के (अॅनिमल सोर्स) (लिक्विड)
उपगट ५ प्रोटिन हायड्रोलायसेट्स ६२.५ टक्के (अॅनिमल सोर्स) (लिक्विड)
प्रोटिन हायड्रोलायसेट्स ४६.०९ टक्के (अॅनिमल सोर्स) (लिक्विड)
प्रोटिन हायड्रोलायसेट्स २९.३४ टक्के (अॅनिमल सोर्स) (लिक्विड) प्रोटिन हायड्रोलायसेट्स १२ टक्के (अॅनिमल सोर्स) (लिक्विड) प्रोटिन हायड्रोलायसेट्स ६८.३३ टक्के (अॅनिमल सोर्स) (लिक्विड) प्रोटिन हायड्रोलायसेट्स ५४ टक्के (अॅनिमल सोर्स) (लिक्विड) प्रोटिनहायड्रोलायसेट्स १५ टक्के (अॅनिमल सोर्स) (लिक्विड) प्रोटिन हायड्रोलायसेट्स २७.०५ टक्के (अॅनिमल सोर्स) (लिक्विड) उपगट ३३ प्रोटिन हायड्रोलायसेट्स ६२.५ टक्के (अॅनिमल सोर्स) (लिक्विड)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 8:35 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
राज्य कृषी विभागाचा मोठा निर्णय! १३ जैव उत्तेजकांवर घातली बंदी, नावांची यादी जाहीर










